
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
अशोक साखर कारखान्या निवडणुकीत प्रहार संघटनेचे अध्यक्ष व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला असून तसे पत्र प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, तालुकाध्यक्ष अॅड. पांडुरंग औताडे यांनी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांचेकडे दिले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सगचिटणीव अविनाश आदिक उपस्थित होते. या भुमिकेचे शेतकरी संघटनेचे अॅड. काळे यांनी स्वागत केले.
अशोक सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी मुरकुटे गटाविरुद्ध शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश आदिक, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, प्रहार संघटना यांच्या पाठिंब्याने सत्ताधार्याविरुद्ध आव्हान उभे ठाकले आहे. भोकर येथे झालेल्या प्रचार बैठकीत पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. ज्येेष्ठ नेते पांडुरंग काळे अध्यक्षस्थानी होते. अविनाश आदिक, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, तालुकाध्यक्ष अॅड. पांडुरंग औताडे, अॅड. सर्जेराव घोडे, डॉ.वंदना मुरकुटे, अर्चना उंडे, अर्चना पानसरे, दिलीप पवार, विष्णू खंडांगळे, युवराज जगताप, नितीन पटारे, कैलास बोर्डे, शरद निवृत्ती पवार आदी उपस्थित होते.
यावेळी सुरेश ताके म्हणाले , अशोक कारखान्याची निवडणूक ही शेतकरी हितासाठी लढवली जात आहे. इथेनॉल निर्मिती केवळ 30 हजार प्रतिदिन होत असताना ती 40 हजार लिटर सांगून शेतकर्यांची दिशाभूल केली जात आहे. कारखाना प्रतिदिन केवळ 02 हजार 800 टन गाळप होत असताना ते 04 हजार 500 टन असल्याचे सांगितले जात आहे. कारखाना शेतकरी सभासद यांची कामधेनू आहे याचा त्यांना विसर पडला आहे. कारखान्याचे गाळप क्षमता वाढवली असती तर शेतकर्यांच्या उसाच्या खोडक्या झाल्या नसत्या. येथील ऊस बाहेरील कारखान्यांना पाठवून शेतकर्यांची चेष्टा सुरू आहे.
नितीन पटारे म्हणाले, कारखान्यापासून दोन ते तीन कि.मी.चा आमचा ऊस तोडला जात नाही. सोळा महिने उलटूनही ऊस नेला जात नाही. त्यामुळे प्रती टन चारशे रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. उसाचे वजन घटते. यावर आता पर्याय देण्याची वेळ आली आहे. शेतकर्यांची ही पिळवणूक थांबविण्यासाठी शेतकरी संघटनेला मताचे दान द्यावे. अॅड. अजित काळे, अविनाश आदिक, शिवाजीराव नांदखिले, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, कैलास बोर्डे, अॅड. औताडे यांची यावेळी भाषणे झाली. प्रास्तविक प्रा. अॅड. सलालकर यांनी केले. सूत्रसंचलन युवराज जगताप यांनी तर बाबासाहेब पटारे यांनी आभार मानले.