अशोक कारखाना निवडणूक रणधुमाळी

अशोक कारखाना निवडणूक रणधुमाळी

विरोधकांकडून केले जाणारे आरोप वायफळ वल्गना- भानुदास मुरकुटे

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

सध्या विरोधक अनेक आरोप करत आहेत परंतु ते सर्व आरोप हे वायफळ वल्गना असून ते शेतकर्‍यांना फसवण्याचं काम करत असल्याची टीका लोकसेवा मंडळाचे नेते भानुदास मुरकुटे यांनी केली.

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे अशोक कारखाना निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. श्री. मुरकुटे म्हणाले, ज्यांना ऊस माहीत नाही ते उसावर बोलतात. मी अजूनही 80 वर्षाचा वाघच असून शेतकर्‍यांच्या हितासाठी कायमच पुढे राहणार आहे. विरोधकांना 16 तारखेला मतदार त्यांची जागा दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून करण ससाणे, सचिन गुुजर, सुभाष पटारे, लाल पटेल, कान्हा खंडागळे, संजय छल्लारे, मुन्ना पठाण, दिगंबर शिंदे, ज्ञानदेव साळुंके, पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर, चंद्रशेखर गटकळ, उपसरपंच बंडू चौगुले, राजेंद्र गायकवाड, सखाराम कांगुणे, राजेंद्र साठे, बाळासाहेब तर्‍हाळ, तंटामुक्ती अध्यक्ष भिमजी साठे, वसंत रोटे, सकाहरी शिंदे, पोपट सरोदे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा शिंदे, किशोर गारुळे, राजेंद्र शिंदे, वसंत भद्रे, जिल्हा दूध संघाचे वसंत शेरकर, सुर्यभान मेहेत्रे, कुंडलिक सरोदे, गंगाधर चौगुले, रघुनाथ सरोदे, लक्ष्मण रोटे, गोरक्षनाथ गटकळ, संजय शिंदे, प्रा. रमेश सरोदे, विजय गोसावी, वसंत कांगुणे, बाळासाहेब पटारे, संभाजी शिंदे, सुभाष सरोदे, मेहन गायकवाड, अशोक शिंदे, मोहन शिंदे, भागवत चौगुले, शिवाजी वरघुडे, कल्याण शिंदे, किशोर बोखारे, बाळासाहेब शिंदे, बाबासाहेब कोकणे आदी उपस्थित हेाते. आभार अमोल कोकणे यांनी मानले.

संचालक मंडळाला कसलेही अधिकार दिले जात नाही- ज्ञानेश्वर मुरकुटे

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

अशोक कारखान्यात संचालक मंडळ व सभासद यांना सावत्र वागणूक दिली जात आहे. संचालक मंडळाला कसलेही अधिकार दिले जात नाही. इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी भाव देवून शेतकर्‍यांना फसवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी केला. बेलपिंपळगाव येथे अशोक सहकारी साखर कारखाना निवडणुकीनिमित्त शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दिलीप शिंदे हे होते.

यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे म्हणाले, काही काळापासून कारखान्यावर संचालक मंडळ व सभासद यांना विरोधक सावत्र वागणूक देत आहेत. या भागातील शेतकर्‍यांना पाण्याचं राजकारण करुन फसवेगिरी करतात. संचालक मंडळाला कसलेही अधिकार देत नाहीत. 34 ते 35 वर्षे सत्ता ताब्यात असूनही ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे हित न बघता स्वतःचं कुटुंब मोठं करण्याचं काम विरोधक करत आहेत.

प्रमुख पाहुणे अविनाश आदिक म्हणाले, शेतकरी संघटना मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरली असून या निवडणुकीत 80 वर्षाचा तरुण मोठ्या फरकाने पडणार आहे. यावेळी नितीन पटारे, विष्णू खंडागळे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे, प्रा. कार्लस साठे, नाना नांदखिळे, अर्चना पानसरे, दिलीप पवार, साहेबराव पवार, देवा कोकणे तसेच गावातील आप्पासाहेब शिंदे, बकसू शिंदे, सिकंदर सय्यद, पोपट पुंड, शिवाजी साठे, बी. डी. शिंदे, दत्तात्रय राऊत, भाऊसाहेब पुंड, बाळासाहेब वाघमारे, बाबासाहेब रोटे, कैलास शिंदे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com