अशोक कारखाना निवडणूक : अवैध अर्जांवर आज निर्णयाची शक्यता

अशोक कारखाना निवडणूक : अवैध अर्जांवर आज निर्णयाची शक्यता
साखर कारखाना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 277 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. पाच वर्षात किमान तीन वेळा ऊस कारखान्यास दिला पाहिजे हे कारण पुढे करुन काल उमेदवारी अर्जाच्या छाननीत अनेक दिग्गज उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवले. यावर संबंधित उमेदवारांनी आक्षेप घेतला. यावर निवडणूक अधिकार्‍यांपुढे युक्तीवाद झाला. याबाबत आज मंगळवार दि.21 डिसेंबर रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.

अशोक सहकारी साखर कारखान्याची 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी 271 जणांनी 277 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काल उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली.या छाननीत अनेक दिग्गज सभासदांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. कारखान्यास पाच वर्षांत किमान तीन वेळा ऊस दिला पाहिजे हा नियम पुढे करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ज्यांनी पाच वर्षात तीन वेळा ऊस दिला नाही अशा सभासदांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद ठरविले. यावर संबंधितांनी आक्षेप घेतला.

ज्या सभासदांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले त्यांच्यावतीने काल अ‍ॅड. अजित काळे यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे बाजू मांडली. सहकार कायद्यातील तरतुदींचा आधार घेत राखीव जागा असेल तर त्यांना हा उसाबाबतचा नियम लागू होत नाही असा दावा केला. तर कारखान्याच्यावतीने सुधारीत बायलॉगचा आधार घेत राखीव असो अथवा सर्वसाधारण जागा असो उसाचा नियम हा लागू होतो असा युक्तीवाद केला. या युक्तीवादानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी याबाबतचा निर्णय राखून ठेवला. याबाबत आज मंगळवार दि.21 डिसेंबर रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com