काळी मांजरे आडवी गेली तरी लोकसेवाचा विजयरथ कोणीच रोखणार नाही - माजी आ. मुरकुटे

काळी मांजरे आडवी गेली तरी लोकसेवाचा विजयरथ कोणीच रोखणार नाही - माजी आ. मुरकुटे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

साखर कारखानदारी अडचणीत असताना अशोक कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करुन कारखान्याला वैभवाच्या शिखरावर नेण्याचा आमचा निर्धार असल्याने येत्या निवडणुकीत कितीही काळी मांजरे आडवी गेली तरी लोकसेवा विकास आघाडीचा विजयरथ कोणीही अडवू शकणार नाही, असा विश्वास माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केला.

अशोक कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने भोकर, वडाळामहादेव व घोगरगाव येथील प्रचार सभेत श्री. मुरकुटे बोलत होते. श्री.मुरकुटे म्हणाले की, 35 वर्षापासूनच्या कालावधहतील संचालक मंडळाने काळाची पावले ओळखून परिस्थितीनुरूप निर्णय घेतले. जुन्या मशिनरीत सुधारणा व काही मशिनरीत बदल करुन कारखाना अद्ययावत केल्यानेच आज दैनंदिन 4200 ते 4400 मे.टन ऊस गाळप करणे शक्य होत आहे.

जिल्हा बँकेचे संंचालक करण ससाणे म्हणाले की, जेथे स्थिर व्यवस्थापन आहे तेच कारखाने टिकले आणि जेथे बदल घडला त्या कारखान्यांची वाताहत झाली. बंद पडलेल्या कारखान्यांमुळे त्या परिसराला अवकळा आल्याची आपल्या जिल्ह्यातच उदाहरणे आहेत. त्यामुळेच अशोक कारखाना ही आपल्या तालुक्याची कामधेनू टिकली पाहिजे. त्यासाठीच माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या हातीच अशोकचा कारभार राहिला पाहिजे.

शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर म्हणाले, अशोक कारखाना हा शेतकरी, कामगार आदी घटकांच्या अर्थकारणाशी निगडीत आहे. कारखाना माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे कारखाना हा व्यस्थित राहिला पाहिजे. यासाठीच राजकारण बाजूला ठेवून आम्ही माजी आ.मुरकुटे यांचे बरोबर राहाण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

यावेळी अ‍ॅड. बाळासाहेब खंडागळे, शेतकरी संघटनेचे सुभाष पटारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, काशिनाथ गोराणे आदींची भाषणे झाली. सभेस लोकसेवा विकास आघाडीचे उमेदवार कोंडीराम उंडे, ज्ञानदेव पटारे, पुंजाहरी शिंदे, सोपानराव राऊत, रामभाऊ कसार, अमोल कोकणे, यशवंत रणनवरे, तसेच भानुदास श्रीपती पवार, आण्णासाहेब चौधरी, रामचंद्र घोगरे, पोपटराव जाधव, लाल पटेल, दिगंबर शिंदे, माणिकराव शिंदे, शिवाजी शिंदे, मयुर पटारे, गोरख गवारे, आबासाहेब गवारे, बाळासाहेब नाईक, भागवतक्षाव पटारे, अ‍ॅड्.सुभाष चौधरी, नारायण पटारे, दिलीप पटारे, बाळासाहेब विधाटे, ज्ञानदेव साळुंके, बाबा पोखरकर, राजेंद्र पाऊलबुद्धे, मुन्ना पठाण, कारभारी तागड, पाराजी पटारे, गणेश छल्लारे, संजय पटारे, ठकचंद खंडागळे, परशराम खंडागळे, सुखदेव वाकडे, याकोब अमोलिक, रामदास शिंदे, यशवंत रणनवरे, सखाराम कांगुणे, पंढरीनाथ मते, हणुमंतराव वाकचौरे, रविंद्र शेरकर, नारायण बडाख, रावसाहेब मगर, रावसाहेब वाघुले, गणेश कांबळे, दिपक काळे, राम पटारे, सागर शिंदे, पांडूरंग पवार, वेडू कसार, माणिकराव पवार, नारायण भाकरे, रामदास उघडे, शरद पवार, राजेंद्र कसार, बाबासाहेब पवार, बापूसाहेब गायकवाड, बापू पवार, बाळासाहेब कसार, सर्जेराव पवार, महंमद सय्यद, बाबासाहेब बेरड, वसंतराव टेकाळे, जगन्नाथ बहिरट, बापूराव पवार, हरिश्चंद्र शिरसाठ, सखाराम पवार, अर्जुन घोगरे, दत्तात्रय बहिरट, राजेंद्र साप्ते, मदन बहिरट, विलास पटारे, रावसाहेब बहिरट, मन्सूर पटेल, बशीर शेख, बाळासाहेब घोगरे, एकनाथ शिरसाठ, बाळसाहेब काशिद, गोरक्षनाथ पटारे, जालिंदर पटारे, दिलीप टेकाळे, राजेंद्र चौरे, भाऊसाहेब पटारे, राधाकिसन बहिरट, तान्हाजी बहिरट, राधाकिसन साप्ते, अशोक बहिरट, रविंद्र शेरकर, बंटीभाऊ गटकळ, राजेंद्र साठे, वसंत शेरकर, खंडेराव सरोदे, पोपट सरोदे, किशोर गारुळे, कृष्णा शिंदे, अशोक गुलदगड, बंडू चौघुले आदींसह सभासद उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com