अशोकनगर फाटा, हरेगाव फाटा, वडाळा महादेव येथे अधिकार्‍यांकडून कडक कारवाई

अशोकनगर फाटा, हरेगाव फाटा, वडाळा महादेव येथे अधिकार्‍यांकडून कडक कारवाई

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala MAhadev

करोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरु आहे.

त्याचाच भाग म्हणून प्रशासकीय अधिकार्‍यांनी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ग्रामपंचायत तसेच करोना समितीस भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. साळवे यांच्या पथकाकडून हरेगाव फाटा, अशोक नगर फाटा येथे विनामास्क फिरणार्‍या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात आली. यावेळी व्यापारी व ग्राहकांंना सूचना देण्यात आल्या.

वडाळा महादेव येथे ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामसुरक्षा समिती यांची भेट घेत प्रांताधिकारी अनिल पवार यांनी करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करोना समितीला विशेष सूचना दिल्या. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी करोना ग्रामसुरक्षा समिती व व्यापार्‍यांना विशेष सूचना दिल्या.

तसेच जो व्यावसायिक मास्क वापरणार नाही तसेच येणार्‍या ग्राहकाला मास्क न वापरता किराणा तसेच इतर वस्तू देतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देत त्यांच्यावर पाचशे रुपये दंड आकारावा व सात दिवसाकरीता संबंधित व्यापार्‍यांचे दुकान सील करावे, असे आदेश प्रशासकिय अधिकारी यांनी दिले.

तसेच आजाराचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे वडाळा महादेव येथे कोवीड सेंटर सुरू करून ग्रामस्थांना परिसरात सुविधा मिळण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात, अशी माहिती दिली. यावेळी सरपंच श्री. दादासाहेब झिंज, उपसरपंच अशोक गायकवाड, कामगार पोलीस पाटील मार्था राठोड, आरोग्य सेविका अलका सातपुते, कामगार तलाठी राजेश घोरपडे, तसेच ग्रामविकास अधिकारी प्रशांत दर्शने तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com