अशोक कारखाना निवडणुकीत दुरंगी लढत

सासरे भानुदास मुरकुटे विरूध्द सून वंदना मुरकुटे रिंगणात
अशोक कारखाना निवडणुकीत दुरंगी लढत
साखर कारखाना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी काल माघारीच्या दिवशी 194 पैकी 152 जणांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने 42 उमेदवार राहिले असून निवडणूक रिंगणात एकास एक उमेदवार एकमेकांसमोर ठाकले आहेत. मुरकुटे गटाचे 21 तर शेतकरी संघटनेचे 21 अशी सरळ दुरंगी लढत होणार आहे.

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी येत्या 16 जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्या सर्व 21 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी चेअरमन रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, सोपानराव राऊत, माजी व्हा. चेअरमन भाऊसाहेब उंडे, माजी संचालक हिंमतराव धुमाळ, आदिनाथ झुराळे, पुंजाहरी शिंदे, बाबासाहेब आदिक अशा अनुभवी उमेदवारांसह विरेश गलांडे, ज्ञानेश्वर शिंदे, वाय. जी. बनकर, प्रफुल्ल दांगट, ज्ञानदेव पटारे, रामभाऊ कसार, ज्ञानेश्वर काळे, यशवंत रणनवरे, अमोल कोकणे, योगेश विटनोर, हिराबाई साळुंके, शीतल गवारे या नवोदितांना संधी देण्यात आली आहे.

लोकसेवा विकास आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण गट : पढेगाव - यशवंत गोविंद बनकर (पढेगाव), हिम्मतराव माधवराव धुमाळ (वळदगाव), रावसाहेब हरी थोरात (उक्कलगाव), कारेगाव - भाऊसाहेब धोंडीराम उंडे (कारेगाव), प्रफुल्ल बाळासाहेब दांगट (भेर्डापूर), ज्ञानेश्वर भिकाजी शिंदे (पाचेगाव), टाकळीभान - भानुदास काशिनाथ मुरकुटे (कमालपूर), ज्ञानदेव सोपान पटारे (घोगरगाव), पुंजाहरी तुकाराम शिंदे (भोकर), वडाळा महादेव - रामभाऊ तुळशीराम कसार (वडाळा महादेव), कोंडीराम बाबाजी उंडे (मातापूर), ज्ञानेश्वर बाबासाहेब काळे (खोकर), उंदिरगाव - विरेश भाऊसाहेब गलांडे (उंदिरगाव), आदिनाथ निवृत्ती झुराळे (निमगावखैरी), बाबासाहेब कडू आदिक (खानापूर), ब वर्ग सोसायटी मतदार संघ : सोपानराव पुंजाजी राऊत (निपाणीवडगाव), अनु. जाती/अनु. जमाती मतदार संघ : यशवंत दिनकर रणनवरे (टाकळीभान), महिला प्रतिनिधी : हिराबाई ज्ञानदेव साळुंके (टाकळीभान), शीतल आबासाहेब गवारे (शिरसगाव), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : अमोल बाबासाहेब कोकणे (बेलपिंपळगाव) तसेच भटक्या विमुक्त जाती/जमाती ः योगेश भाऊसाहेब विटनोर (खिर्डी) याप्रमाणे लोकसेवा विकास आघाडीचे 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

निवडणुकीत शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली विरोधकांनी उमेदवार उभे केले असून या मंडळाचे उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. सर्वसाधारण उत्पादक गट : पढेगाव- जितेंद्र आबासाहेब भोसले, दत्तात्रय जगन्नाथ लिप्टे, विलास इंद्रनाथ थोरात, कारेगाव- युवराज जगताप, अरुण गंगाधर कवडे, दिलीप शिवाजी पवार, टाकळीभान- डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे, विष्णुपंत नाथु खंडागळे, खंडेराव निवृत्ती पटारे, वडाळा महादेव- अर्चना संजीव उंडे, शरद निवृत्ती पवार, नानासाहेब लक्ष्मण गवारे, उंदिरगाव- अनिल प्रभाकर औताडे, निलेश सुरेश आदिक, शिवाजी आप्पासाहेब शेजुळ, उत्पादक बिगर उत्पादक पणन संस्था मतदारसंघ (ब वर्ग) : प्रकाश प्रभाकर जाधव, महिला राखीव मतदारसंघ : अर्चना संजय पानसरे, शांताबाई भगीरथ जाधव, इतर मागास प्रवर्ग मतदार संघ : नितीन रामदास पटारे, विमुक्त जाती/भटक्या जमाती मतदारसंघ : प्रवीण रामचंद्र देवकर, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ : कार्लस कचरू साठे या उमेदवारांचा समावेश आहे.

मुरकुटे यांच्याकडून जुन्या नव्यांचा मेळ

अशोक सहकारी साखर कारखाना आपल्याच ताब्यात पुन्हा यावा यासाठी त्यांनी 6 विद्यमान संचालकांसह 5 माजी अध्यक्षांना या निवडणूक रिंगणात उतरविले आहे. तसेच काही माजी संचालक व विद्यमान संचालकांच्या पत्नी व मुलांचा यात समावेश करुन नव्यांना संधी देवून जुन्या नव्यांचा मेळ घालण्याा पयत्न केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com