अशोक कारखाना निवडणूक : पाचेगाव व भेर्डापूरमधील उमेदवार व्हेंटिलेटरवर

अशोक कारखाना निवडणूक : पाचेगाव व भेर्डापूरमधील उमेदवार व्हेंटिलेटरवर

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील 21 जागांपैकी सत्ताधार्‍यांनी 18 उमेदवारांची नावे जाहीर केले, पण कारेगाव गटातून पाचेगाव व भेर्डापूर या गावांतील उमेदवारी काल सायंकाळपर्यंत जाहीर केली नाही. त्यामुळे या गावातील उमेदवार मात्र व्हेंटिलेटरवर दिसत आहेत.

पाचेगाव व भेर्डापूर येथे उमेदवारी देताना मात्र सत्ताधारी गटाची दमछाक झाली आहे.कारेगाव गटातून पाचेगाव व भेर्डापूर मधून सत्ताधार्‍याकडून अनेक जणांनी आपले अर्ज दाखल करून आपापल्यापरीने उमेदवारीसाठी फिल्डींग लावली आहे. अर्ज दाखल केलेल्या सर्वांना आपसात मेळ घालून मला तुम्ही एक नाव सुचवावे असे आ.मुरकुटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. मात्र दोन वेळा मुदत देऊनही एकमत न झाल्याने काल सोमवारी सायंकाळपर्यंत स्वतः मुरकुटे हे निश्चित करतील अशी अपेक्षा होती मात्र काल सायंकाळ पर्यंतही या गावातील उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.

आज मंगळवार दि. 4 जानेवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने आज दोन गावांतील उमेदवारी जाहीर होईल. त्यामुळे तिकिटाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निश्चित होईल.याची उत्सुकता या दोन गावांतील सर्व सभासदांना लागली आहे.

आतापर्यंतच्या इतिहासात इतकी मोठी गर्दी ही सत्ताधार्‍यांकडे पाहायला मिळाल्यामुळे मुरकुटे यांची देखील उमेदवारी देताना कोंडी होत आहे.

Related Stories

No stories found.