यापुढील सर्व निवडणुका एकत्रित लढणार

माजी आ.मुरकुटे-उपनगराध्यक्ष ससाणे यांची संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा
यापुढील सर्व निवडणुका एकत्रित लढणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्याच्या (Shrirampur Taluka) विकासासाठी तसेच तालुक्यात निर्माण होणारे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही एकामेकांशी चर्चा करून अशोक कारखान्यासह (Ashok Factory) मुळा-प्रवरा (Mula Pravara), जिल्हा परिषद (ZP), पंचायत समिती (Panchayat Samiti) तसेच नगरपालिकेच्या निवडणुका (Municipal Elections) यापुढे एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा माजी आ. भानुदास मुरकुटे (Former MLA Bhanudas Murkute) व उपनगराध्यक्ष करण ससाणे (Deputy Mayor Karan Sasane) यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

श्रीरामपूर तालुका (Shrirampur Taluka) व शहरातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन तसेच सर्वांना विश्वासात घेवून अशोक कारखान्याच्या निवडणुकीत माजी आ. भानुदास मुरकुटे (Former MLA Bhanudas Murkute) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे (Deputy Mayor Karan Sasane) यांनी दिली.

माजी नगराध्यक्ष संजय फंड यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, भास्करराव लिप्टे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक दिलीप नागरे, मनोज लबडे, मुजफ्फर शेख, जि. प. सदस्य बाबासाहेब दिघे, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, रितेश रोटे, शशांक रासकर, संकेत संचेती, सुनील क्षीरसागर, राजेंद्र पाऊलबुध्दे, पुंडलिक खरे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. मुरकुटे (Former MLA Bhanudas Murkute) म्हणाले, जिल्ह्यातील अनेक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यात संगमनेर (Sangamner), प्रवरा सहकारी कारखाना (Pravara Co-operative Factory) यांचा समावेश आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुध्दा तालुक्यात करण ससाणे व माझी बिनविरोध केली. अपेक्षीत नसणारी घटना त्यावेळी घडली.

संस्था हा व्यवसाय आहे. या संस्था हिशोबाने व काटकसरीनेच चालू शकतात. यात नफातोट्याचा विचार केला पाहिजे. अशा संस्था एका विचाराने चालल्या पाहिजेत. ज्या संस्थांमध्ये मतभेद झाले त्या संस्था, ते कारखाने अडचणीत आले आणि काही कारखाने बंद पडले आहेत. तेव्हा बदल सातत्याने केल्यानेच ते कारखाने अडणीत आले. सहकारी संस्था ह्या हिशोबाने चालू शकतात म्हणून आपण अशोक कारखान्याची निवडणूक एका विचाराने चालवली पाहिजे. म्हणून अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एका विचाराने लढली गेली पाहिजे. म्हणून आम्ही एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहेत. आपल्याला आज 11 टीएमसी भंडारदरा (Bhandardara) व साडेआठ टीएमसी पाणी निळवंडे (Nilwande) असे पाणी वापरायला आहे. दोन वर्षानंतर निळवंडेच्या (Nilwande) कार्यक्षेत्रात कालवे होणार आहे. त्यावेळी यातील साडेआठ टीएमसी पाणी वर जाणार आहे. निळवंंडेच्या लाभ क्षेत्रातला ते मिळणार आहे. निळवंडेचा (Nilwande) लाभ आपल्या तालुक्याला मिळणार नाही. आपल्याला केवळ 7 टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. यात जास्तीत जास्त दोन रोटेशन मिळू शकेल. त्यामुळे आपल्याला पुरेशे पाणी मिळणार नाही. भविष्यात पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. राजकारणात विखे-थोरात यांचा मोठा संघर्ष आहे. मात्र कारखान्याच्या निवडणुकीत थोरात-विखे (Thorat-Vikhe) यांनी आपला संघर्ष बाजुला ठेवून बिनविरोध निवडणुका केल्या. त्याप्रमाणे जिल्ह्यातील मुळा, ज्ञानेश्वर, संजीवनी, कोसाका यासह अन्य कारखान्याच्या निवडणुकाही बिनविरोध झाल्या आहेत. आपल्या तालुक्यातील अशोक कारखान्याची निवडणूकही बिनविरोध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आपल्या तालुक्याची कामधेनू म्हणून समजल्या जाणार्‍या अशोक सहकारी साखर कारखान्यावर (Ashok co-operative Sugar Factory) अनेक शेतकर्‍यांचे तसेच कामगारांचे प्रपंच अवलंबून आहे. जिल्ह्यात ज्या ज्या साखर कारखान्यात सत्तांतर झाले त्या ठिकाणी मोठ्या अडचणी निर्माण होवून कारखाने बंद पडले आहेत. अशोक कारखान्यात माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी अतिशय चांगला कारभार केला आहे. सहकारी संस्थांमध्ये विनाकारण राजकारण न करता एका चांगल्या कामाच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. आणि अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आ. भानुदास मुरकुटे यांना पाठिंबा देत आहोत, असे करण ससाणे यांनी जाहीर केले.

आगामी मुळा-प्रवरा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिट्या, नगरपरिषदा निवडणुकीसंदर्भात मुरकुटे यांच्याबरोबर चर्चा करुन यापुढील सर्व निवडणुका ससाणे-मुरकुटे एक़त्रित लढणार असल्याचा निर्णय घेतला आहे. याअगोदरही याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ. लहू कानडे यांच्या सोबत चर्चा झाली आहे. त्यांनी याबाबत हिरवा झेंडा दाखविला असल्याचेही करण ससाणे यांनी सांगितले.

जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय नाही

ससाणे-मुरकुटे गटाचा जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. माघारीसाठी बराच कालावधी आहे. उमेदवारी अर्ज सर्वच भरणार आहेत. मात्र चर्चा करुन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जे आमच्याबरोबर येणार असतील त्यांना घेवू आणि जे येणार नाही त्यांच्याशिवाय आम्ही लढू, असेही मुरकुटे यांनी सांगितले.

आम्हालाच तंबूतून बाहेर काढले

या अगोदर आम्ही राष्ट्रवादीत असताना आम्ही त्यांना आमच्याबरोबर घेतले, निवडणुका लढविल्या, हाती सत्ता येताच ते तंबूत राहिले आणि आम्हाला तंबू बाहेर काढले, अशी टिका नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचे नाव न घेता मुरकुटे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com