मुरकुटेंच्या घरामोर उद्या ठेचा भाकर खाऊन निषेध

अशोकने दिवाळीपूर्वी पेंमेट न केल्याने || स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार निषेध
मुरकुटेंच्या घरामोर उद्या ठेचा भाकर खाऊन निषेध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोक सहकारी साखर कारखान्याने (Ashok Co-operative Sugar Factories) दिवाळीपूर्वी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना (Sugarcane Growers) जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत सेकंड पेमेंट (Payment) करून शेतकर्‍यांची दिवाळी गोड करणे अपेक्षित होते परंतु एक रुपयाही न देऊन अशोकच्या प्रशासनाने (Administration of Ashok) शेतकर्‍यांची दिवाळी काळी केली आहे. याचा निषेध (Protest) म्हणून शेतकरी दिवाळीच्या दिवशी म्हणजेच उद्या दि. 4 नोव्हेंबर रोजी अशोक सहकारी साखर कारखान्याचे (Ashok Co-operative Sugar Factories) सूत्रधार माजी आ. भानुदास काशिनाथ मुरकुटे (Farmers MLA Bhanudas Kashinath Murkute) यांच्या जिद्द या निवासस्थानासमोरील शासकीय जागेत खर्डा-भाकर खाऊन निषेध करण्याचा इशारा (Hint) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatane) दिला आहे.

याबाबतचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले व सुरेश पाटील ताके यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, अशोकने आजपर्यंत फक्त भूल थापा दिलेल्या आहेत. आसवनी उभारणीच्यावेळी 200 रुपये प्रति टन सभासद शेतकर्‍यांना फायदा होईल तसेच इथेनॉल प्रकल्प (Ethanol project) उभारणीच्या वेळीही तसेच आश्वासन दिले होते. 110 कोटींच्या 15 मेगावॉट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणीच्या वेळीही अशोकच्या संचालक मंडळाने 200 रुपये जास्त मिळतील अशा वल्गना केल्या होत्या.

परंतु अशोकने कधीही आसवनी, इथेनॉल तसेच सहवीज निर्मिती प्रकल्प नसलेल्या कारखान्यांपेक्षा जास्त दर दिलेला नाही. ज्या कारखान्यांकडे दारू आहे असेच कारखाने जास्त दर देऊ शकतात असे कारखान्याचे सूत्रधार सांगतात मग दारूचे उत्पादन नसलेला संगमनेर कारखाना जास्त दर कसा देऊ शकतो असा सवाल आता शेतकरी करू लागले आहेत. मागील वर्षी अशोकच्या संचालक मंडळाने बी. हेवी व सी. हेवी मळीच्या सवलतीचा फायदा घेऊन कारखान्याची रिकव्हरी किमान 1.5 टक्के कमी दाखवली याचा तोटा पुढच्या वर्षीच्या दरात होईल असा आरोप संघटनेने केला आहे.

उद्या होणारे निषेध आंदोलन कायद्याच्या चौकटीत राहून तसेच कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेऊन तसेच कोविड नियमांचे पालन करून करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी येणारे शेतकरी मूकपणे खर्डा - भाकर खाऊन आपला निषेध व्यक्त करतील असेही या निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com