पाथर्डीत विविध शाळांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

टाळमृदंगासह विठू नामाचा गजर
पाथर्डीत विविध शाळांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

आषाढी एकादशीनिमित्त पाथर्डी शहरातील विविध शाळांनी बाल वारकर्‍यांची दिंडी काढून आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली. यावेळी टाळमृंदगासह विठू नामाचा गजर झाला.

श्री स्वामी विवेकानंद, श्री तिलक जैन इंग्लिश मीडियम स्कूल, स्वामी समर्थ विद्यामंदिर, यशवंत पब्लिक स्कूल, जिल्हा परिषद शाळा, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, गर्भगिरी प्री प्रायमरी स्कूल, सावित्रीबाई फुले विदयालय व शहरातील इतरही खाजगी व शासकिय शाळांनी डाळ मृदुंगाच्या निनादात बाल वारकर्‍यांची दिंडी काढली. दिंडीतील छोट्या छोट्या बालकांनी केलेली वेशभूषा विशेष आकर्षण ठरत होती. श्री विवेकानंद विद्यामंदिरातील विद्यार्थांनी विविध अभंगाच्या तालावर व विठ्ठलाचा महिमा गाणार्‍या गीतावर विद्यालयातील 80 विद्यार्थ्यांनी लेझीम पथकातून विविध संदेश दिला.

ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव, सावता, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, चोखामेळा, जनाबाई, मीराबाई आदी संतासह विठ्ठल रुक्मिणीचा वेश परिधान करून मोठ्या उत्साहात टाळ- पताकासह दिंडी सोहळ्यात सामील झाले. दिंडी सोहळ्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेश आव्हाड, वैभव शेवाळे, राजेंद्र कोटकर,धन्यकुमार गुगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. श्री तिलोक जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारकर्‍यांचे वेशभूषा परिधान करून विठ्ठलाचा गजर करत आषाढी एकादशी साजरी केली. संस्थेचे सचिव सतीश गुगळे यांनी या विद्यार्थ्यांचा कौतुक केले. स्वामी समर्थ विद्यामंदिरमधील मुख्याध्यापक एकनाथ ढोले उपस्थित होते.

यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल मधल्या विद्यार्थ्यांची दिंडी शहरातून विविध चौकातून मिरवण्यात आली. गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने आषाढी एकादशी निमित्त आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पावली, रिंगण नृत्य हा विशेष भाग ठरला. या संस्थेच्या विश्वस्त सविता कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक जयश्री चौधरी, संस्थेचे जनरल सेक्रेटरी भास्कर गोरे व माजी नगरसेविका सुरेखा रमेश गोरे यांनी सहभागी घेतला. जिल्हा परिषद शाळा, गर्भगिरी प्री प्रायमरी स्कूल व इतर शाळांच्या बालदिंडी सोहळ्याने पर्थ नगरी दुमदुमली. पाथर्डी येथील एम.एम.निर्‍हाळी विद्यालयांमध्ये प्रवेशद्वारावर असणार्‍या फलकावर आषाढी एकादशीनिमित्त विद्यालयाचे कलाशिक्षक गणेश सरोदे यांनी रंगीत खडूचा वापर करून सुंदर विठ्ठलाचं चित्र रेखाटलं होतं हे चित्र सर्वांचे आकर्षण ठरले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com