आषाढी एकादशी : शिर्डीत भाविकांची मांदियाळी, साईमंदीरास आकर्षक फुलांची सजावट

आषाढी एकादशी : शिर्डीत भाविकांची मांदियाळी, साईमंदीरास आकर्षक फुलांची सजावट

शिर्डी | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Ekadashi) करोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे मोजक्याच भाविकांची मांदियाळी पंढरपुरात दिसुन येत असतांना दुसरीकडे साईबाबांना (Saibaba) विठ्ठल स्वरुप माननाऱ्या हजारो भाविकांनी देखील शिर्डीत (Shirdi) हजेरी लावून साईमंदीराच्या कळसाचे दर्शन घेतले असून संस्थान प्रशासनाने एकादशीचे महत्व लक्षात घेता प्रसादरुपी साडेपाचशे किलोची शाबूदाणा खिचडी आणि झिरके तयार करण्यात आले होते.

दरम्यान आषाढी एकादशी निमित्त शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा जनसागर उलटत असतो मात्र मागील दोन वर्षापासून करोना आजाराने थैमान घातल्याने राज्यात संचारबंदी लागू आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्यातील मंदिरे बंद करण्यात आले आहे. मंगळवार दि.२० रोजी आषाढी एकादशीला साई समाधी मंदिराला दुबई येथील देणगीदार साईभक्त डॉ.अनिता दिनेश यांच्या देणगीतुन आकर्षक फुलं आणि फळांची सजावट करण्यात आली. सकाळ पासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

साईबाबा संस्थानचे दोन्ही रुग्णालयात रुग्णांना,वृद्धाश्रमात, पोलीस कर्मचारी तसेच संस्थान कर्मचाऱ्यांना भोजन प्रसाद मिळावा यासाठी उपवासाची ५५० किलोची खिचडी आणि शेंगदाण्याचे झिरकं बनविण्यात आले होते. सकाळी आणी सायंकाळी दोन्ही वेळेस २ हजार ५०० लोकांनी प्रसादाचा लाभ घेतला. लाँकडाऊन शिथिल जरी केले असले तरी साईमंदीर अद्यापही बंद आहे. मात्र शिर्डी माझे पंढरपुर हि आरती साईबाबा मंदीरात नित्य निमयमाने म्हटली जाते. त्याचीच प्रचीती काल काही प्रमाणात झालेल्या भाविकांच्या गर्दीतून दिसुन आली.

दरम्यान साईबाबा हयातीत असतांना साईबाबांचे परमभक्त दासगणु महाराज हे आषाढीच्या वारीला दरवर्षी पंढरपुरला विठ्ठलदर्शनासाठी जात असत दासगणुंची एक आषाठी वारी चुकली त्यावेळी विठ्ठल दर्शनासाठी आतुर झालेल्या दासगणुंना साईबाबांनी विठ्ठलाच्या रुपात दर्शन दिले तेव्हापासुन दासगणु महाराजांनी शिर्डी माझे पंढरपुर अशी रचना केली.आजही साईमंदीरात बाबांच्या मंगलस्नानंतर हि आरती म्हटली जाते. आषाढी एकादशीच महत्व लक्षात घेवुन विठ्ठलाची प्रतीमा समाधीवर ठेवुन साईबाबांच्या मुर्तीला तुळशीची माळ अणि सुवर्ण आभुषणे चढवण्यात आली होती. एरवी वर्षभर साईबाबांना फुलांची माळ घातली जाते मात्र फक्त आषाढी एकादशीलाच बाबांना तुळशीची माळ घालण्यात येते.

मागील वर्षी देखील मंदिर बंद असल्याने ८०० किलोची खिचडी प्रसाद तयार केला होता.तेव्हाही दोन हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला होता. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने रात्री भगवान विठ्ठल रुखमिणीची प्रतीमा ठेवुन साईंच्या रथाची मिरवणुक शिर्डी गावातून काढण्यात येते परंतु दोन वर्षापासून कोव्हिडच्या कारणास्तव सदरची मिरवणूक रद्द करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com