आषाढी एकादशीनिमित्त पुणतांब्यात विद्यार्थ्यांची पायी दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त पुणतांब्यात विद्यार्थ्यांची पायी दिंडी

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

आषाढ महिन्यातील कामिका एकादशी निमित्ताने पुणतांबा येथील विद्यार्थी व विद्यार्थीनींचा भव्य पायी दिंडी सोहळा पुणतांबा बाजारपेठ ते चांगदेव मंदिरापर्यंत सर्व शाळांनी आयोजित केलेला होता.

यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पुणतांबा यांचे पाचवी ते आठवी सर्व विद्यार्थी, रूरल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे सर्व विद्यार्थी, लिटल एंजल्स स्कूलचे सर्व विद्यार्थी व सर्व शाळेतील शिक्षकवृंद या भव्य पायी दिंडी सोहळ्यात उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा परिधान केलेली होती. काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई, काहींनी साधुसंत तर काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाईची पालखी खांद्यावर घेऊन विठ्ठल नामाचा गजर केला.

संत सद्गुरू चांगदेव महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. दिंडीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या हातामध्ये ध्वज पताका होत्या. अतिशय भक्तिमय वातावरणात सर्व शाळांनी नियोजनबद्ध दिंडीचे आयोजन केले होते. यावेळी पुणतांबा येथील भजनी मंडळ सुद्धा सामील झालेले होते. बाजारपेठेमध्ये काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर व त्यावर नृत्य सादर केले. याप्रसंगी सर्व शाळेतील प्राचार्य, शिक्षक वृंद, सरपंच, शाळेमधील विश्वस्त, ग्रामस्थ पालक वर्ग आपल्या चिमुकल्यांचा नृत्य अविष्कार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com