शेकडो पायी दिंड्यांचे नेवाशात आगमन

सर्व रस्ते गर्दीने फुलले
शेकडो पायी दिंड्यांचे नेवाशात आगमन

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

आषाढ वद्य कामिका एकादशीनिमित्त आज नेवासा येथे सकाळपासून शेकडो दिंड्यांचे आगमन होत असून लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने सर्व रस्ते फुलून गेले आहेत.

शेवगाव रोड, श्रीरामपूर रोड, नगर रोड आदी सर्व रस्त्यांवर पायी दिंड्यांतून भाविक येताना दिसत आहेत. शहरात कोणत्याही वाहनांना प्रवेश प्रतिबंधित केल्याने व शहराबाहेरून वाहतूक वळविल्याने भाविकांना अडथळ्याविना दर्शनासाठी जाणे शक्य झाले आहे.

श्रीरामपूरहून नेवासाफाटा, शेवगावकडे तसेच औरंगाबाद कडे जाणारी वाहने व प्रवाशांना 20 ते 40 किलोमीटर अधिक दूरच्या पर्यायी मार्गाने जावे लागत असल्याने त्यांना वेळेचा व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com