
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केला आहे. आता ही वाढ 1 एप्रिलपासून मिळणार आहे.
17 मार्च 2023 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आशा स्वयंसविका यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्ययात येणार्या दरमहा रूपये 3500 या मोबदल्यात दरमहा एकूण 1500 रूपयांची वाढ करण्यात आली आहे.
गटप्रवर्तकांना दरमहा 4700 रूपये मोबदला देण्यात येता त्यात दरमहा 1500 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. यासाठी सन 2023-24या अर्थसंकल्पीयय वर्षात होणार्या अंदाजे 507.77 कोटी रूपयांच्या वार्षिक खचास मान्यता देण्यात आली आहे.