ज्ञान विज्ञानाचा समन्वय साधला तरच जीवन सुखी होईल - अरुणनाथगिरी महाराज

ज्ञान विज्ञानाचा समन्वय साधला तरच जीवन सुखी होईल - अरुणनाथगिरी महाराज

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

ज्ञानाला विज्ञानाची जोड देताना माणसाने स्वतःची मनोवृत्ती सकारात्मक केली की, जगण्यातला आनंद वाढतो. केवळ ज्ञानाने किंवा केवळ आध्यात्माने माणूस ज्ञानी बनतो असे नाही. नवनवीन तंत्रज्ञानाच्या कक्षा मोठ्या प्रमाणावर विस्तारत असताना संपूर्ण जगच विज्ञानाने आपल्या कवेत घेतले आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाने ज्ञानाबरोबरच विज्ञानालाही सोबत घेऊन चालणे अनिवार्य झालेले आहे, असा उपदेश श्री क्षेत्र अडबंगनाथ देवस्थानचे महंत अरुणनाथगिरी महाराज यांनी केला.

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या अठराव्या पुण्यस्मरणानिमित्त संवत्सर येथे आयोजित कार्यक्रमात संत विचार : ज्ञान - विज्ञान समन्वय या विषयावर ते बोलत होते. जि.प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी भानुदास महाराज रोहोम, भरत महाराज, माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कृषी अधिकारी पंडित वाघिरे, गोदावरी दूध संघाचे संचालक राजेंद्र बापू जाधव, उपाध्यक्ष संजय खांडेकर, सरपंच सुलोचना ढेपले उपस्थित होते. गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

शालिनी विखे म्हणाल्या, मुलींच्या शिक्षणाविषयीचे परजणे आण्णांच्या मनात असलेले स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झाले. संवत्सर व कोपरगांव परिसरात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील मुली मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेण्यास प्रवृत्त झाल्या असे सांगून आण्णांच्या कार्यास त्यांनी उजाळा दिला.

यावेळी महानुभाव आश्रम परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय व कोपरगांव येथील महिला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले. तसेच महिला महाविद्यालयाच्या कृपासिंधू या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी नानासाहेब सिनगर, गोरखनाथ शिंदे, उत्तमराव माने, भाऊसाहेब कदम, सदाशिव कार्ले, निवृत्ती नवले, सयराम कोळसे, चंद्रकांत लोखंडे, खंडू फेपाळे, लक्ष्मण साबळे, लक्ष्मण परजणे, अनिल आचारी, सोमनाथ निरगुडे, अशोकराव काजळे, अ‍ॅड. गंगाधर कोताडे, रामभाऊ निकम, दादा दुपके, दिलीप ढेपले, साहेबराव सैद, माजी उप भियंता उत्तम पवार, कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे, अ‍ॅड. बाळासाहेब कडू, योगेश जोबनपुत्रा, मंगेश पाटील, अनिल सोनवणे, प्रा. आंबादास वडांगळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com