ऑक्सीजनचा कृत्रिम तुटवडा, टाळूवरचे लोणी खाणारे ‘ते’ कोण?

लोकांच्या जीवाशी खेळणार्‍यांंना नोकरीतून हाकला
ऑक्सीजनचा कृत्रिम तुटवडा, टाळूवरचे लोणी खाणारे ‘ते’ कोण?

अहमदनगर (प्रतिनिधी)-

#ऑक्सीजनचा_कृत्रिम_तुटवडा करून अन्न व औषध प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्य मानव जातीला वेठीला धरत आहेत. यावरून भावना तीव्र आहेत. आणि हे खरे असेल तर अशा बेजबाबदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रसिक ग्रुपचे जयंत येलुलकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

करोनाच्या या संकटकाळात आपली जबाबदारी, कर्तव्य प्रामाणिक पणाने पार पाडायची अपेक्षा असताना औषध प्रशासनातील काही सरकारी नोकर भ्रष्ट मार्गाने पैसा कमावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. त्यासाठी मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळविण्यासाठी ऑक्सीजनचा कृत्रिम तुटवडा निर्माण करत असतील, तर अशा बेजबाबदार अधिकारी, कर्मचार्‍यांना नोकरीतून बेदखल केले पाहिजे.

काही नालायक लोकांमुळे सामान्य जनतेच्या जीवावर बेतणार असेल तर ही स्थिती क्लेशदायक आहे. #डॉक्टर्स, #नर्स, प्रामाणीक कर्मचारी एकीकडे मोलाचे योगदान असताना दुसरीकडे असे भ्रष्ट, लाचखोर सरकारी नोकर सरकारला, जनतेला फसवत असतील आणि टाळूवरचे लोणी खात असतील तर त्यांना धडा शिकवा, असे येलूलकर यांनी म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com