वाहन चालकाला लुटणारा गजाआड

वाहन चालकाला लुटणारा गजाआड

दुचाकी जप्त: एलसीबीची कामगिरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

टेम्पो चालकास लुटणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. नितीन सुभाष खिलारे (वय 26 रा. बांदरवडा ता. पाथरी जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.

10 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे दत्तात्रय दगडू नलवाडे (रा. सविदने ता. शिरूर जि. पुणे) हे पाथर्डी तालुक्यातून टेम्पो घेवुन जात असताना दुचाकीवरून आलेल्या एकाने टेम्पो जाळण्याची धमकी देत नलवाडे यांच्याकडील 44 हजार रूपयांची रक्कम लुटली होती. याप्रकरणी नलवाडे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्याची माहिती काढून पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकातील सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, विश्वास बेरड, रवी सोनटक्के, शंकर चौधरी, रणजित जाधव, रवींद्र घुंगासे, सागर ससाणे, रोहित यमूल, मच्छिंद्र बर्डे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने आरोपी खिलारे याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबूली दिली असून पुढील तपासकामी त्याला पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.