जवळातील एटीएम पळवणारी टोळी गजाआड

पारनेर पोलीसांची कामगिरी
जवळातील एटीएम पळवणारी टोळी गजाआड

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील जवळा येथील इंडिया वन लि. या कंपनीचे ए.टी.एम मशिन हे बोलेरो जिपच्या साहाय्याने वायररोप लावुन तोडुन नेऊन त्यातील 3 लाख 28 हजार700 रुपयांची रोकड पळवणार्‍या 6 जणांच्या टोळीला पारनेर पोलीसांनी जेरबंद केले आहे.

जवळातील एटीएम पळवणारी टोळी गजाआड
खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गजाआड

ऋतक शिवाजी केंद्रे (20), उमेश हरिभाऊ सातपुते (22), तुषार रखमाजी पवार (21), दिनेश हरिभाऊ सातपुते (24, सर्व रा.पिंपळनेर ता. पारनेर), आकाश उर्फ बुंग्या सुभाष पाचुदकर (24), सुर्यकांत उर्फ काळया शंकर धुमाळ (25, रा. दोघेही रांजणगाव ता. शिरूर जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर इतर दोघे फरार आहेत.

जवळातील एटीएम पळवणारी टोळी गजाआड
श्रीगोंद्यात चार दुचाकी पेटवल्या

ही घटना 15 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजे दरम्यान जवळ्यातील शिरूर रोडवर घडली होती. सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांना गोपनीय माहीती मिळाली होती. त्या आधारे गुन्हयातील संशयित शतीक शिवाजी बेंद्रे (रा. पिंपळनेर ता. पारनेर) यास ताब्यात घेवून चौकशी केली असताना त्याने 7 साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना अटक करण्यात आली आहे.

जवळातील एटीएम पळवणारी टोळी गजाआड
नववर्षाचे स्वागत यंदाही घरीच!

त्यांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि. आर.डी.काळे हे करत आहेत. तपासा दरम्यान आरोपीतांकडुन बरेच गुन्हे उपडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर एकुण 22 गुन्हे वेग वेगळया पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.

जवळातील एटीएम पळवणारी टोळी गजाआड
मुलाच्या अपघाती मृत्यूची बातमी कानी पडताच आईनेही सोडला जीव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com