<p><strong>अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar</strong></p><p>राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचार्यांच्या 1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 या सहा महिन्यांच्या कालावधीतील 3 टक्के महागाई भत्ता वाढीच्या </p>.<p>थकबाकीची रक्कम जानेवारी 2021 च्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश वित्त विभागाने जारी केले आहेत. 8 जुलै 2019 अन्वये राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचार्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 1 जानेवारी 2019 पासून 9 टक्क्यांवरून 12 टक्के असा सुधारित करण्यात आला होता. 1 जुलै 2019 पासून सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.</p>