कारमधून सुगंधी तंबाखूची वाहतूक

साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त; एक अटकेत
कारमधून सुगंधी तंबाखूची वाहतूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कारमधून वाहतूक केली जाणारी सुगंधी तंबाखू कोतवाली पोलिसांनी पकडली. कार, सुगंधी तंबाखू, रोख रक्कम असा 10 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरूवारी पहाटे बी.एस.एन.एल.गल्लीत पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस अंमलदार अभय कदम यांच्या फिर्यादीवरून सुगंधी तंबाखूची वाहतूक करणार्‍याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तौसिफ अहेमद सिद्दीकी (वय 36 रा. हत्तेसिंगपुरा, औरंगाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अशोका हॉटेलच्या समोरील रोडवर बी.एस.एन.एल गल्लीत येथे एक इसम इनोव्हा चारचाकी (एमएच 20 बीटी 7633) लावून सुगंधी तंबाखूची चोरून विक्री करत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार कदम, दीपक बोरूडे, सलीम शेख, विष्णू भागवत, सुमित गवळी, अतुल काजळे, दीपक कैतके, अनुप झाडबुके यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने नमूद ठिकाणी गुरूवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान छापा टाकला असता त्यांना चारचाकी वाहनामध्ये 51 हजार रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू मिळून आली. वरील सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत वाहतूक करणार्‍या सिद्दीकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

मशीनच्या सहाय्याने मावा निर्मिती; पोलिसांचा छापा

सुगंधी तंबाखूचा वापर करून मशीनच्या सहाय्याने मावा तयार करण्याचा उद्योग रामवाडी येथील घरात सुरू होता. तोफखाना पोलिसांनी छापा टाकून मशीन, सुगंधी तंबाखू, वजन काटा असा 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस नाईक संदीप धामणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश शंकर मामड्या (वय 27 रा. रामवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. रामवाडी भागात घरामध्ये सुगंधी तंबाखूचा वापर करून मशीनच्या सहाय्याने मावा तयार करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक समाधान सोळुंके, अंमलदार सुनील शिरसाठ, दत्तात्रय जपे, अविनाश वाकचौरे, सतीश त्रिभुवन, धामणे यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने बुधवारी सायंंकाळी बातमीतील नमूद ठिकाणी छापा टाकला असता त्यांना आकाश शंकर मामड्या हा घरात मशीनच्या सहाय्याने सुगंधी तंबाखूचा वापर करून मावा तयार करताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत साहित्य जप्त केले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com