25 हजाराची सुगंधी तंबाखू पकडली

तिघांविरूध्द गुन्हा || दोघे ताब्यात
25 हजाराची सुगंधी तंबाखू पकडली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सुगंधी तंबाखूची वाहतुक करणारा टेम्पो भिंगार कॅम्प पोलिसांनी रविवारी सकाळी नगर-पुणे रोडवरील अशोका हॉटेलसमोर पकडला. टेम्पोसह 25 हजार रूपये किंमतीची सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोहर अर्जुन खेडकर (वय 42 रा. महेशनगर, भिंगार), सुशील बाळासाहेब केदार (वय 23 रा. नवनागापूर) व सचिन डोंगरे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. वडगाव गुप्ता ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. खेडकर व केदार यांना ताब्यात घेतले आहे. नगर-पुणे रोडने पांढर्‍या रंगाच्या टेम्पोमधून सुगंधी तंबाखूची वाहतुक केली जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती.

त्यांनी पोलीस अंमलदार कैलास सोनार, अजय नगरे, विलास गारूडकर, राहुल व्दारके, राहुल गोरे, भानुदास खेडकर यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने अशोका हॉटेलसमोर टेम्पो पकडून ताब्यात घेतला असता त्यामध्ये 25 हजार रूपये किंमतीची सुगंधी तंबाखू मिळून आली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार गोपीनाथ गोर्डे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com