
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यात तंबाखुजन्य (Tobacco) पदार्थाचे विक्री व तयार करण्यास प्रतिबंध असताना नालेगावातील (Nalegav) दातरंगे मळा येथे इलेक्ट्रॉनिक मशिनच्या सहाय्याने मावा (Mava) तयार करून विक्री करणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने छापा (LCB Raid) टाकून पकडले. त्याच्या ताब्यातून सुगंधी तंबाखूसह (Aromatic Tobacco) इलेक्ट्रॉनिक मशिन असा सुमारे दीड लाखांचे साहित्य जप्त (Seized) करण्यात आले आहे. आरोपी अभिषेक प्रविण भिंगारदिवे (रा. दातरंगे मळा) याला अटक (Arrested) करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके (LCB PI Anil Katake) यांना गुप्त खबर्यामार्फत माहिती मिळाली की, आरोपी अभिषेक भिंगारदिवे हा मानकर गल्ली सिध्दविनायक मंदिराजवळ एका खोलीमध्ये सुगंधी तंबाखू (Aromatic Tobacco) इलेक्ट्रॉनिक मशिनच्या सहाय्याने मावा तयार करून विक्री करत आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला. घरामध्ये मशिनचे सहाय्याने सुगंधी तंबाखु (Aromatic Tobacco) व सुपारी यांचे मिश्रण करून मावा (Mava) तयार करताना आढळून आला.
त्यास ताब्यात घेऊन नाव विचारले असता, त्याने अभिषेक प्रविण भिंगारदिवे (वय 20) असे असल्याचे सांगितले. त्या ठिकाणची झडती घेतली असता सुगंधी तंबाखू, 42 किलो तयार मावा, मिक्सप इलेक्ट्रीक मशिन असा सुमारे एक लाख 60 हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.
पोलिस अंमलदार कमलेश पाथरूट यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार सुनील चव्हाण, संदीप पवार, रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, कमलेश पाथरूट, योगेश सातपुते, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.