अडीच लाखाची सुगंधी तंबाखु पकडली

File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थानिक गुन्हे शाखेने खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे छापा (LCB Raid) टाकून सुगंधी तंबाखु (Aromatic Tobacco), सुपारी तसेच दोन इलेक्ट्रिक मशिन (Electric Machine) व साधने असा 2 लाख 46 हजार 250 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी दत्तात्रय मथाजी अंदुरे (वय 39, रा. खरवंडी कासार, ता. पाथर्डी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

File Photo
सहा सराईतांची टोळी पकडली

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर (LCB PI Dinesh Aher) यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रय गव्हाणे, पोना रवींद्र कर्डिले, विशाल गवांदे, शिवाजी ढाकणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरिक्षक आहेर यांना माहिती मिळाली, अंदुरे हा स्वत:च्या घरात महाराष्ट्रात बंदी विक्रीस बंदी असलेला मावा (Mava) मशिनव्दारे तयार करून त्याची चोरून विक्री करीत आहे. त्यांच्या सूचनेवरून पथकाने सदर ठिकाणी छापा (LCB Police Raid) टाकून दत्तात्रय अंदुरे यास ताब्यात घेतले.

File Photo
अशोक कारखान्याने एफआरपीची रक्कम थकविली

त्याच्या कब्जातून मावा तयार करण्यासाठी आवश्यक असलेली सुगंधी तंबाखु (Aromatic Tobacco), सुपारीचा चुरा (Betel Nut), दोन इलेक्ट्रिक मशिन असा 2 लाख 46 हजार 250 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोकॉ शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात (Pathardi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

File Photo
मृत महिला रुग्णाच्या कानातील सोन्याच्या बाळ्या चोरल्या
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com