लष्कराच्या भरतीत दोघांची कॉपी

नगरच्या लष्करी विभागातील प्रकार || पोलिसांत गुन्हा
लष्कराच्या भरतीत दोघांची कॉपी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील लष्कराच्या विविध पदांच्या भरतीसाठी आयोजित केलेल्या लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या आधारे कॉपी करताना दोन परीक्षार्थ्यांना लष्कराच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले आहे. दोघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी रमेश संधू (वय 22 जि. हिस्सार, हरियाणा) व पूजा सुरेंद्र जलंदरा (वय 22 जि. जिढप, हरियाणा) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत कर्नल एल. सी. कटोजा यांनी फिर्याद दिली. भिंगार येथे असलेल्या लष्करी विभागात विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा रविवारी सकाळी 10 ते दुपारी 12 या कालावधीत आर्मी पब्लिक स्कूलमध्ये घेण्यात आली. या परीक्षेदरम्यान दोन्ही परीक्षार्थीनी ब्ल्यूटूथ तसेच इलेक्ट्रीक डिव्हाईसच्या मदतीने कॉपी करण्याचा प्रयत्न आढळून आले. ही बाब परीक्षा हॉलमध्ये नियुक्त असलेल्या लष्करी अधिकार्‍यांच्या लक्षात आली.

त्यामुळे त्यांनी त्या दोघांना रंगेहाथ पकडले. रवी संधू व पूजा जलंदरा यांच्याविरूध्द फसवणूक आणि विद्यापीठ अधिनियम 1994 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com