नगरहून येऊन टिटवाळात सशस्त्र दरोडा

सीसीटीव्हीने दरोडेखोरांचा सुगावा, 10 पैकी 3 अटकेत
नगरहून येऊन टिटवाळात सशस्त्र दरोडा

कल्याण -

टिटवाळ्यात सशस्त्र दरोडा टाकणार्‍या एका टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हे दरोडेखोर

अहमदनगरहून टिटवाळ्यात दरोडा टाकण्यासाठी आले होते. यानंतर ते लूटपाट करुन नगररला परतलेही. मात्र, सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा सुगावा लागला. कल्याण तालुका पोलिसांना 10 पैकी 3 आरोपींना अटक करण्यात यश आलं. इतर आरोपी फरार आहेत.

कल्याण तालुक्यातील पावशेपाडा आणि काही भागात 20 मार्चच्या पहाटे काही दरोडेखोर आले. त्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. काही घरात घूसून लोकांच्या वस्तू लूटल्या आणि फरार झाले. यानंतर या दरोडेखोरांचा दरोडा टाकतानाचं सीसीटीव्ही फुटेज चांगलंच व्हायरल झालं. टिटवाळ्यात अशाप्रकारे दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे टिटवाळा पोलिसांसमोर दरोडेखोरांना पकडण्याचं मोठं आव्हान होतं.

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे एलसीबी आणि टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजू वंजारी यांनी यासाठी तपास पथके तयार केली आणि तपास सुरु झाला. अखेर या प्रकरणात 3 दरोडेखोरांना अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी संतोष दराडे म्हणाले, तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु होता. अखेर या प्रकरणी 10 ते 12 दरोडेखोरांपकी 3 दरोडेखोर अक्षय गायकवाड, किरण जांभळकर आणि अनिल पवार या तिघांना अटक करण्यात आली.

इतर आरोपींचा शोध सुरु आहे. नगरमधील पारनेरहून हे दरोडेखोर बोलेरो गाडीत बसून टिटवाळ्यात आले होते. जवळपास 4 लाखाचा ऐवज लूटन ते पसार झाले. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र या प्रकरणात अजून 7 ते 9 आरोपी फरार आहेत. त्यामुळे पोलीस कॅमेर्‍यावर काही बोलायला तयार नाहीत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com