अरणगावच्या वाडया वस्त्यांवर पुर्ण दाबाने होणार वीज पुरवठा
अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar
अरणगाव ग्रामपंचायत हद्दीमधील वाड्या वस्त्यांवर पुर्ण दाबाने विद्यत पुरवठा होणार आहे. शेतकर्यांनी आता काळजी करू नये. तातडीने यावर कार्यवाही होणार असल्याचे खा. डॉ. सुजय विखे यांनी आश्वासन दिले
अरणगाव (ता.नगर) येथील शेळके मळा, मोरे मळा, मुदळ वस्ती, ढमढेरे मळा, गहिले मळा, मतकर मळा, शिंदे मळा, चोपन वाडी या वाड्या वस्त्यांवर विट्युत पुरवठा कमी दाबाने होत होता. दिवसभरात आठ तासच विदयुत पुरवठा होत होता. त्यातही खंड पडत होता. यामुळे येथील शेतकर्यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या संदर्भात सहा महिन्यांपूर्वी खा. डॉ. विखे या संदर्भात पत्रव्यवहार केला होता. नुकतीच डॉ. खा. विखे यांची ग्रामस्थांनी भेट घेतली.
अरणगावमधील नाट मळा येथील जाणार्या बायपास रोडवर भुयारी मार्ग करून देण्यासंदर्भात व नवीन चास फिडरवरून येणारे विद्युत वाहिनी जोडून देण्यासंदर्भात चर्चा केली. या भागातील शेतकरी व वस्तीवर राहणारे नागरीक यांना चास फिडरवरून पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा, रेल्वे क्रॉसिंग करून विद्युत वाहिनी येत्या चार दिवसांमध्ये जोडून देणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. यावेळी विविध विकास कामासंदर्भात चर्चा करण्यात आली. सोसायटी अध्यक्ष ज्ञानदेव शेळके, मोहन गहिले, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रशांत गहिले, हरिभाऊ शिंदे, काशिनाथ शिंदे, आप्पासाहेब शिंदे, संतोष दळवी, राहुल माळवदे, रवी कलापुरे, गहिले आदी उपस्थित होते.