आरडगावला वयोवृद्ध महिलेवर महिलेनेच केला कुर्‍हाडीने वार

चार महिलांवर राहुरीत गुन्हा दाखल
आरडगावला वयोवृद्ध महिलेवर महिलेनेच केला कुर्‍हाडीने वार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

माझ्या घरासमोर भांडण करू नका, असे म्हणाल्याचा राग आल्याने राहुरी तालुक्यातील आरडगांव येथील कुसूमबाई पवार या 60 वर्षीय महिलेवर कुर्‍हाडीने वार करून मारहाण केल्याची घटना दि. 20 जुलै रोजी घडली. याप्रकरणी राहुरी पोलिसांत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवार यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान आरडगाव येथे पवार यांच्या घरासमोर भांडण चालू होते. तेव्हा पवार या आरोपींना म्हणाल्या, तुम्ही लिलाबाईला कशाला मारहाण करता? तुम्ही माझ्या घरासमोर भांडण करू नका. असे म्हणाल्याचा राग येऊन यातील आरोपींनी कुसूमबाई पवार व लिलाबाई यांना शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण केली. तसेच आरोपीने कुसूमबाई पवार यांच्यावर कुर्‍हाडीने वार करून जखमी केले.

पवार यांच्या फिर्यादीवरून अर्चना अनिल गायकवाड रा. राहुरी, गयाबाई केरु माळी रा. आश्वी ता. संगमनेर, गयाबाई हिची मुलगी पुनम राहणार दत्तनगर राहुरी, गयाबाई हिची मुलगी सोनम रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी या चार महिलांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार रवींद्र डावखर करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com