आरडगाव, मानोरी, केंदळ खुर्द ग्रामपंचायतीसाठी आरक्षण जाहीर

आरडगाव, मानोरी, केंदळ खुर्द ग्रामपंचायतीसाठी आरक्षण जाहीर

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणणुकीच्या पार्श्वभूमीवर सन 2022 या कालावधीत होणार्‍या निवडणूक कार्यक्रमांतर्गत विशेष ग्रामसभेत आरडगांव, मानोरी, केंदळ खुर्द या ग्रामपंचायतीत सदस्य प्रभागनिहाय राखीव आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. हे आरक्षण काही इच्छुकांच्या पथ्यावर तर काही इच्छुकांच्या मुळावर आले आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम हाती घेतला आहे. आरडगाव ग्रामपंचायतीच्या एकूण प्रभाग क्रमांक 4 पैकी प्रभाग क्र.1 मधून 2 जागा अनुसूचित जाती (एस.सी) व्यक्ती -1 सर्वसाधारण महिला -1, प्रभाग 2 -जागा - 3 अनुसूचित जमाती (एस.टी ) महिला -1, सर्वसाधारण व्यक्ती- 1, सर्वसाधारण महिला -1, प्रभाग - 3 जागा 3 अनुसूचित जमाती (एसटी) महिला -1, सर्वसाधारण व्यक्ती -1, सर्वसाधारण महिला -1, प्रभाग 4 जागा 3 अनुसूचित जमाती (एसटी) व्यक्ती -1, सर्वसाधारण व्यक्ती - 1, नागरिकांचा प्रवर्ग महिला -1 अशा एकूण 11 जागेसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

केंदळ खुर्द ग्रामपंचायतीच्या एकूण प्रभाग 3 पैकी प्रभाग क्र.1 मधून 3 जागा सर्वसाधारण व्यक्ती - 1, अनुसूचित जमाती (एसटी) महिला-1, सर्वसाधारण महिला-1, प्रभाग 2 - जागा - 3 अनुसूचित जमाती व्यक्ती -1, सर्वसाधारण व्यक्ती - 1, सर्वसाधारण महिला - 1, प्रभाग - 3 जागा 3 - अनुसूचित जाती (एस.सी) व्यक्ती -1, सर्वसाधारण महिला - 1, इतर मागास प्रवर्ग (ओबीसी )महिला-1 अशा एकूण 9 जागेसाठी आरक्षण काढण्यात आले आहे.

मानोरी ग्रामपंचायतीच्या एकूण प्रभाग क्रमांक 5 पैकी प्रभाग क्र. 1 अनुसूचित जाती व्यक्ती 1, सर्वसाधारण स्री 1, प्रभाग क्र. 2 सर्वसाधारण व्यक्ती 1, सर्वसाधारण स्री 1, प्रभाग क्र.3 मधे सर्वसाधारण व्यक्ती 1, सर्वसाधारण स्री 1, सर्वसाधारण स्री 1, प्रभाग क्र.4 सर्वसाधारण व्यक्ती 1, सर्वसाधारण स्री 1, सर्वसाधारण स्री 1, प्रभाग क्र. 5 अनुसूचित जाती स्री 1, अनुसूचित जमाती व्यक्ती 1, सर्वसाधारण व्यक्ती 1 अशा एकूण 13 जागेसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com