आरडगावला बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

आरडगावला बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

आरडगांव येथे रात्रीच्या वेळी शेळ्यांच्या आशेने आलेल्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. यात कुत्रा गंभीर जखमी झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

आरडगाव परिसरत झुगे वस्ती व भांड वस्ती या परिसरात मोठ्या प्रमाणात शेळीपालन व कुक्कुटपालन केले जाते. रात्री साडेअकराच्या सुमारास चंद्रशेखर मच्छिंद्र गुडघे या शेतकर्‍याच्या घरी घरगुती चार शेळ्या आहेत. या शेळ्यांच्या आशेने आलेल्या बिबट्याची कुत्र्याला चाहुल लागताच त्याने भुकणे सुरू केले. बिबट्याने कुत्र्याला गवतात ओढून नेले. शेतकर्‍यांनी आरडाओरडा सुरू केला. हे बघून परिसरातील शेतकरी जागे झाले. फटाके वाजवित टेंभे पेटविल्याने बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला.

यामधे कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. यापूर्वी बापूसाहेब म्हसे, आसाराम देशमुख, पाडुरंग हारदे, यांच्या शेळ्या बिबट्याने फस्त केल्या व या परिसरातील संजय झुगे यांच्या पोल्ट्री फार्मवरही डल्ला मारण्याचा प्रयत्न केला होता. संबंधित वनविभागाने तातडीने दखल घेत पिंजरा लावण्याची मागणी येथील शेतकरी वर्गामधून केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com