
आरडगाव |वार्ताहर| Aradgav
पाच वर्षात सत्ताधार्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत तिन्ही मंडळांनी एकमेकांवर पिण्याच्या पाणी योजना, रस्ते, वीज, घरकुल योजना, बंदिस्त गटारे, ढोल, स्मशानभूमी, गायरान जमिनीवरील अतिक्रमण या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप करीत चौकार व षटकार यांची फटकेबाजी करीत प्रचार नारळ सभा चांगल्याच गाजविल्या.
या निवडणुकीत तनपुरेगट व विखे, कर्डीले गटात खंबीर पाठबळाच्या जोरावर सत्ताधारी व विरोधक गटाकडून चांगले चांगले उमेदवार निवडणूक रिंगणात उतले आहेत. त्यामुळे चालू पंचवार्षिक निवडणुकीत वेगळेच चित्र पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
राहुरी तालुक्यातील राजकारणात अग्रेसर असणार्या आरडगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यापदाच्या 11 जागांसाठी होत आसलेल्या निवडणुकीत ग्रामविकास मंडळाकडून सरपंचपदासाठी सुरेखा म्हसे, तर जनसेवा मंडळाकडून स्मिता मोरे तसेच महादेव जैतोबा वंचित बहुजन आघाडी मंडळाच्या धनश्री जाधव उमेदवार आहेत.
सदस्यपदासाठी प्रभाग क्र.1 निलेश जगधने, सुरेखा जगधने, स्वाती म्हसे, यास्मिन पठाण, पल्लवी काळे, राजेंद्र जाधव, प्रभाग क्र.2 मधून भाऊसाहेब जाधव, लिलाबाई झुगे, सुमन जाधव, लता मोरे, स्वाती गागरे, सुनीता झुगे, सोनाली जाधव, प्रभाग क्र.3 उत्तम वने, मच्छिंद्र म्हसे, मनीषा जाधव, उषा जाधव, मंदाबाई म्हसे, अलका वने, सुवर्णा जाधव, प्रभाग क्र.4 सुरेंद्र जाधव, शरद बर्डे, सुनील जाधव, सचिन खुरुद, भरत काळे, धनश्री जाधव, संगीता तांबे,आशा वने हे उमेदवार उभे आहेत. मतदार कोणाच्या ताब्यात सत्ता देणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे.