
आडगाव |वार्ताहर| Aradgav
राजकीय दृष्ट्या संवेदनशिल असलेली राहाता तालुक्यातील आडगाव बद्रुक सेवा सोसायटीच्या निवडणुकीत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जय मल्हार जनसेवा मंडळाने दणदणीत विजय मिळविला. संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. या संस्थेच्या अध्यक्षपदी वसंत तुकारात शेळके यांची तर उपाध्यक्षपदी रामदास लहामगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते.
राहाता तालुक्यातील आडगाव बुद्रुक सेवा सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत जय मल्हार जनसेवा मंडळाने सात जागा जिंकत बहुमत मिळविले. नुकतीच संस्थेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी आर.के. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी करण्यात आल्या. अध्यक्षपदासाठी वसंत तुकाराम शेळके यांचा व उपाध्यक्ष पदासाठी रामदास लहामगे यांचा अर्ज दाखल झाला.
दोन्ही पदासांठी एक एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आर के. जाधव यांनी वसंत शेळके यांची अध्यक्षपदी तर रामदास लहामगे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक गोरक्षनाथ सूर्यभान शेळके, सुनील मारूती शेळके, गोरख काशिनाथ शेळके, रामदास विठ्ठल आंबेडकर, भारत कारभारी शेळके, संजय संपत शेळके, निलेश माधवराव शेळके, नवनाथ कारभारी जाधव, शोभा सुभाष शेळके, झुंबरबाई भागवत शेळके, कांता गंगाधर शेळके उपस्थित होते. आभार संस्थेचे सचिव सोपान सातपुते यांनी मानले.
यावेळी भिकाजी शेळके, सी. एम. शेळके, भीमराज शेळके, शिवाजी शेळके, शिवाजी राऊत, बाळासाहेब शेळके, संभाजी शेळके, सुभाष शेळके, राजेंद्र शेळके, प्रभाकर वराडे, संदीप शेळके, राजेंद्र शेळके, सचिन शेळके, बबनराव शेळके, संतोष लहामगे, रवि आंबेडकर, सौरभ शेळके, सनिल बर्डे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सर्व नूतन संचालक मंडळाचे आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी अभिनंदन केले.