चोरट्यांचा बंदोबस्त व अवैध धंदे बंद करण्याचा ठराव आरडगाव ग्रामस्थांकडून समंत
सार्वमत

चोरट्यांचा बंदोबस्त व अवैध धंदे बंद करण्याचा ठराव आरडगाव ग्रामस्थांकडून समंत

ठराव संमत करून कारवाईची मागणी

Nilesh Jadhav

आरडगाव | वार्ताहर | Aradgaon

राहूरी तालुक्यातील आरडगांव येथे रात्रीच्या वेळी गावातीलच भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढल्याने या चोरट्यांचा व दारू, मटका, जुगार या सारखे अवैध धंदे बंद व्हावा यासाठी ग्रामस्थांनी तातडीने बैठक बोलून हे सर्व करण्याचा निर्णय घेत, याचे लेखी निवेदन राहुरी पोलिसांना देण्याचा ठराव संमत करून कारवाईची मागणी केली आहे.

लिबांजी अशोक जगधने व प्रमोद अशोक जगधने या दोघांचा साथीदारांच्या साह्याने संजय मारुती म्हसे यांची मोटार सायकल चोरून नेली होती. त्याचा तपास काढत या चोरट्यांना राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कारणांवरून ग्रामस्थांची तातडीने बैठक बोलावून या चोरट्यांच्या नातेवाईकांना बोलावून गावातील विद्युत मोटारी, केबल, कोंबड्या, शेळ्या, बोकडे, ग्रामपंचायत मार्फत गावात ठिकाणी लावलेले सौर ऊर्जेवरील इन्वर्टर बॅटरी, दुकानातील चोरी थांबली नाहीतर तुमच्या मुलांना जबाबदार धरून चोप देण्यात येईल अशी समाज या चोरट्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. तसेच दारू, मटका व जुगार यासारखे अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com