सेवानिवृत्त शिक्षकांचे मंजूर फरक बील वेतन पथक कार्यालयात धूळखात पडून

मुख्याध्यापकांवर कारवाई करा : शिक्षक संघटना
सेवानिवृत्त शिक्षकांचे मंजूर फरक बील 
वेतन पथक कार्यालयात धूळखात पडून

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची ऑफलाईन 3 टक्के महागाई भत्ता मंजूर बिल केवळ शाळेतील लिपिकाने वेतन पथकातून बँकेत सादर केलेली नाहीत. यामुळे हे बिल तीन महिन्यांपासून वेतन पथक कार्यालयात धूळखात आहेत. काहींनी ही बिले शाळेच्या कपाटात ठेवून दिली असून काही ठिकाणी पैशाची मागणी होत आहे. यामुळे महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष उद्धव गुंड, रमेश जाधव, रोहिदास कांबळे, प्रभाकर खणकर यांनी शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन देऊन संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी केली आहे.

जानेवारी 2019 ते मे 2019 या पाच महिन्यांची फरकाची रक्कम असून केवळ वेतन पथकातून बँकेत नेऊन देयके न दिल्याने वेतन पथकात व शाळेच्या कपाटात धूळखात पडून आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक लाभापासून वंचित राहिले आहेत. वेतन पथकात अनेक शाळांची बिले गठ्ठ्यात पडून आहेत. तर काही शाळांची बिले गहाळ झाली आहेत. त्यामुळे फरकाची बिले मिळतात की नाही? याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.

मुख्याध्यापकांच्या हलगर्जीपणामुळे तीन महिन्यांपूर्वी मंजूर झालेली बिले शाळेच्या वेतन खात्यावर जमा होऊनही मिळाली नाहीत. सेवानिवृत्तांचा कोणीही फोन घेत नाही. शाळा त्यांना सहकार्य करीत नाही. त्यास मुख्याध्यापक जबाबदार आहेत. विलंब काळातील फरकावरील व्याज मुख्याध्यापकांकडून वसूल करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. अन्यथा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com