मिरजगाव-खर्डा येथे नव्या पोलीस ठाण्यांना मंजुरी

अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर आ. पवारांनी केली पुर्ण
मिरजगाव-खर्डा येथे नव्या पोलीस ठाण्यांना मंजुरी
आ. रोहित पवार

जामखेड (तालुका प्रतिनिधी)

आ. रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या पाठपुराव्याने मतदारसंघातील कर्जत (Karjat) व जामखेड (Jamkhed) तालुक्याच्या पोलीस ठाण्याचे (Police Station) विभाजन होऊन आता मिरजगाव (Mirajgoan) व खर्डा (Kharda) या ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणे (News Police Station) निर्माण होऊन त्या अनुषंगाने मनुष्यबळ उपलब्ध करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांच्या प्रतिक्षेला कायमचाच पुर्णविराम मिळाला आहे.

या दोन्ही पोलीस ठाण्यात प्रत्येकी 6 संवर्गातील एकुण 70 अधिकारी-कर्मचारी पदभार सांभाळणार आहेत. आ. रोहित पवारांनी पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळवून दाखवलेली ही पॉवर नागरीकांच्या संरक्षणासाठी व कायदा-सुव्यवस्थेसाठी मोलाची ठरणार आहे.त्यांनी पोलीस यंत्रणेला सक्षम करण्यासाठी विशेष काळजी घेतली आहे. कित्त्येक वर्षांचा रखडलेला पोलिस वसाहतीचा प्रश्न त्यांनी केलेल्या पाठपुराव्याने मार्गी लागत आहे. पोलीस यंत्रणा अधिक गतिमान करण्यासाठी दोन योद्धा चारचाकी वाहने, 4 दुचाकी, 8 पोलिस चौक्या उपलब्ध केल्या आहेत. गुन्ह्यांचा तपास जलद गतीने लागावा व गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी कर्जत व जामखेड शहरात सीसीटीव्ही संयंत्रणाही लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यांचे हे प्रयत्न गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी ठरत आहेत.

सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या खाजगी सावकारकीला आळा, महिलांच्या प्रश्नांसाठी असलेले भरोसा सेल, तात्काळ मदतीसाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा असे प्रभावी समाजपयोगी उपक्रम नागरीकांच्या सुरक्षेसाठी ढाल बनून काम करत आहेत. त्यातच आता मंजुर झालेल्या या अधिकच्या पोलीस ठाण्यांमुळे तात्काळ गुन्हेगारांना जेरबंद करता येणार आहे.आणि नागरिकांना वेळेत सुविधा देणे शक्य होणार आहे.नागरिकांची अनेक वर्षांपासून असलेली ही मागणी अखेर आ. पवार यांनी पुर्ण केली आहे. दडपशाही, खोट्या गुन्ह्यांची संख्या कमी होऊन आता सर्वसामान्य नागरिकांचा आवाज मतदारसंघात वाढलेला दिसुन येतो हा बदल निश्चितच प्रत्येकाला सुखावणारा आहे.

मिरजगाव व खर्डा येथे प्रत्येकी अशी असेल पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांची पदसंख्या.

यात सहायक पोलिस निरीक्षक 1, पोलिस उपनिरीक्षक 1, सहायक पोलिस उपनिरीक्षक 3, पोलीस हवालदार 6,पोलीस नाईक 9, पोलीस शिपाई 15 एकुण-35

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com