कर्जत तालुक्यातील ‘या’ रस्त्यांच्या दर्जोन्नतीस मंजुरी

कर्जत तालुक्यातील ‘या’ रस्त्यांच्या दर्जोन्नतीस मंजुरी

मुंबई / Mumbai - अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 70.70 किमी इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाचे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा उन्नत करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे.

कर्जत तालुक्यातील रस्ते दर्जोन्नत करण्याची मागणी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांच्याकडे केली होती. यासंबंधीचा प्रस्ताव नाशिक विभागाच्या मुख्य अभियंत्याकडून प्राप्त होताच सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी हे रस्ते दर्जोन्नत करण्यास मान्यता दिली. रस्त्यांची देखभाल दुरुस्ती होण्यासाठी हे रस्ते दर्जोन्नत करण्यात आले आहेत.

यामध्ये प्र.रा.मा. 8 ते निमगांव डाकू –मलठण-तरडगाव-निंबोडी-सितपूर-नागपूर-नागलवाडी-मिरजगाव-गुरवप्रिंपी-चांदे बु.-बिटकेवाडी शिंदे ते कोपर्डी प्र.जि.मा 56 मिळणारा रस्ता (56.270 किमी) आणि रा.मा.67 कुळधरण ते पिंपळवाडी-सोनाळवाडी ते राशीन रा.मा.54 मिळणारा रस्ता (14.500 किमी) या रस्त्यांचा समावेश आहे. हे रस्ते दर्जोन्नत केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी 4640.315 किमी इतकी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com