राहुरी (तालुका प्रतिनिधी) -

किमान आधारभूत शेतमाल खरेदी योजनेअंतर्गत सन 2020 ते 2021 उत्पादित झालेल्या तुरीच्या आधारभूत हमीभाव केंद्रासाठी

महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशन व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या आदेशावरून नेवासे, कोपरगाव, श्रीरामपूर व राहातासह राहुरी तालुक्यातील तूर खरेदी करिता राहुरी तालुका खरेदी-विक्री संघास मान्यता देण्यात आल्याची माहिती खरेदी-विक्री संघ, राहुरीचे अध्यक्ष युवराज तनपुरे यांनी दिली.

हमीभाव तूर खरेदी योजनेअंतर्गत होणार्या तूर खरेदीस 6 हजार रुपये भाव प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला आहे. श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव, राहुरी तालुक्यातील तूर उत्पादकांनी या खरेदी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन युवराज तनपुरे यांनी केले आहे. आधारभूत तूर खरेदी केंद्रासाठी उत्पादकांनी नाव नोंदविताना आधारकार्ड, तूर नोंद असलेला सातबारा उतारा, संलग्न असलेले बँक पासबुक इत्यादीच्या झेरॉक्सप्रती तसेच कार्यरत असलेला मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करावी. नाव नोंदणीसाठी शेतकर्यांनी सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत कागदपत्रांसह स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असून नोंदणीनंतर क्रमवारीनुसार नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे शेतकर्यांना कळविण्यात येईल.

यामुळे शेतकर्यांचा अनावश्यक वेळ खर्च होणार नाही. विक्रीसाठी आणलेल्या मालाची आर्द्रता 12 चे आत असावी व माल दर्जेदार असावा. तरी या योजनेचा राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, राहुरी तालुक्यातील तूर उत्पादक शेतकर्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन खरेदी-विक्री संघ, राहुरीचे अध्यक्ष युवराज तनपुरे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.