‘त्या’ दोन अंमलदारांची पोलीस मुख्यालयात नेमणूक

पोलीस ठाण्यात वाद करणे भोवले
‘त्या’ दोन अंमलदारांची पोलीस मुख्यालयात नेमणूक

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील (Bhingar Camp Police Station) ठाणे अंमलदार कक्षात वाद (Police Dispute) करणे दोन अंमलदारांना भोवले. चौकशीअंती पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांनी त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयात केली आहे. अधीक्षक ओला यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

‘त्या’ दोन अंमलदारांची पोलीस मुख्यालयात नेमणूक
शरद पवार 6 जानेवारीला लोणीत

पोलीस अंमलदार आर.के.दहिफळे (R.K. Dahifale) व बी.जी.खेडकर (B.G. Khedkar) अशी त्यांची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक भिंगार कॅम्प यांनी त्या दोघांना तात्काळ नेमणुकीच्या ठिकाणी हजर होणी कामी कार्यमुक्त करून पुर्तता अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 30 नोव्हेंबर, 2022 रोजी रात्री या दोन अंमलदारांमध्ये पोलीस ठाणे अंमलदार यांच्या कक्षात वाद झाले होते.

‘त्या’ दोन अंमलदारांची पोलीस मुख्यालयात नेमणूक
मनपा नावालाच, तर सुविधा ग्रामपंचायतीपेक्षा बेकार

यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी तशी नोंद स्टेशन डायरीला केली होती. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत होती. तसा अहवाल निरीक्षक देशमुख यांनी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील (DSP Ajit Patil) यांच्याकडे सादर केला होता. उपअधीक्षक पाटील यांनी चौकशीअंती अहवाल पोलीस अधीक्षक ओला यांना पाठविला होता. यावर अधीक्षक ओला यांनी निर्णय घेत अंमलदार दहिफळे व खेडकर यांची नेमणुक पोलीस मुख्यालयात केली आहे.

‘त्या’ दोन अंमलदारांची पोलीस मुख्यालयात नेमणूक
नगरमध्ये कर्डिलेंचे वर्चस्व तर शेवगावात राष्ट्रवादीचा वरचष्मा

दरम्यान पोलीस ठाणे अंमलदार कक्षात वाद झाल्यानंतर याची चर्चा पोलीस दलात सुरू झाली. त्या अंमलदारांवर वरिष्ठांकडून कारवाई कधी होणार, अशी चर्चा यानिमित्ताने होत होती. अखेर अधीक्षक ओला यांनी त्यांच्यावर कारवाई करत पोलीस मुख्यालयात त्यांची नेमणूक केली आहे.

‘त्या’ दोन अंमलदारांची पोलीस मुख्यालयात नेमणूक
जिल्ह्यात राष्ट्रवादी नंबर वन !

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com