रयतच्या संचालकपदी आ.लंके यांची नियुक्ती

रयतच्या संचालकपदी आ.लंके यांची नियुक्ती

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळात आमदार निलेश लंके यांची नियुक्ती झाली आहे. सोमवारी (दि.9) सातारा येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आ. लंके यांच्या निवडीचा ठराव करण्यात आला. तालुक्यात यापूर्वी स्व. बाबासाहेब ठुबे, स्व.मार्तंडनाना पठारे, स्व.अ‍ॅड नाथ माधव शिंदे, स्व. मिराबाई रोहोकले यांना ही संधी मिळाली होती.

माजी आमदार विजय औटी, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शंकरराव माने, ज्ञानदेव पांडूळे हे रयतच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत. आ. लंके हे करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये केलेल्या कामामुळे राज्यभरात प्रकाशझोतात आले आहेत. खा. शरद पवार यांनी आ. लंके यांच्या कामाची दखल घेत राज्यातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी आ. लंके यांची निवड केली. तसेच त्यांना आणखी बळ दिले आहे.

Related Stories

No stories found.