APMC Election Result : राहात्यात विखेंचाच डंका, श्रीरामपुरात श्रीरामपुरात विखे-मुरकुटे-ससाणेंची सत्ता

कोपरगावात काळे-कोल्हेंची सहमती एक्सप्रेस, नेवाशात गडाखच, अकोलेत महाविकास आघाडीचा विजय; शेवगावात घुलेंनी गड राखला, जामखेड फिप्टी फिप्टी
APMC Election Result : राहात्यात विखेंचाच डंका, श्रीरामपुरात श्रीरामपुरात विखे-मुरकुटे-ससाणेंची सत्ता

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राहात्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाने दणदणीत विजय संपादित केला. कोपरगावात मागील प्रमाणेच आ. काळे आणि कोल्हे गटाच्या सहमती एक्सप्रेसला मतदारांनी यंदा पसंती दिली. श्रीरामपुरात ना. विखे, माजी आमदार भानुदास मुरकुटे- जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या गटाने एकहाती सत्ता हस्तगत केली. नेवाशात विरोधकांचा सुफडासाफ करत माजी मंत्री आ. शंकरराव गडाख गटाने गड राखला. अकोलेत महाविकास आघाडीने सत्ता हस्तगत केली आहे.

राहात्यात विखेंचाच डंका

राहाता बाजार समितीच्या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सर्वच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. राहाता बाजार समितीत ना. विखे पाटील यांच्या गटाची सत्ता होती. पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत जनसेवा मंडळाने मोठा फरकाने विजय प्राप्त केला आहे. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरत यांनी विखेंच्या बालेकिल्ल्यात विधानसभा वगळता पहिल्यांदाच तालुका पातळीवरील निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला. विरोधी महाविकास आघाडीचा ४०० ते ४५० मतांच्या फरकाने पराभव झाला.

APMC Election Result : राहात्यात विखेंचाच डंका, श्रीरामपुरात श्रीरामपुरात विखे-मुरकुटे-ससाणेंची सत्ता
तात्पुरते लग्न करून युवकाला दोन लाखांचा गंडा

कोपरगावात काळे-कोल्हेंची सहमती एक्सप्रेस

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गत निवडणुकीत 'सहमती एक्सप्रेस' धावली होती. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली होती. याही वेळी 'सहमती एक्सप्रेस' धावली होती. पण शिवसेनेच्या ठाकरे गट आणि काँग्रेसने यावर्षी पॅनेल निवडणुकीत उतरविला. पण मतदारांनी 'सहमती एक्सप्रेस' ला पसंती दिली. या निवडणुकीत आ. काळे गट ७, कोल्हे ७, २ औताडे, २ परजणे गट 9 अशा १८ उमेदवारांनी विजय मिळवत झेंडा फडकावला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी ३ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.

APMC Election Result : राहात्यात विखेंचाच डंका, श्रीरामपुरात श्रीरामपुरात विखे-मुरकुटे-ससाणेंची सत्ता
APMC Election Result : श्रीगोंदा बाजार समिती कुणाच्या ताब्यात?

श्रीरामपुरात विखे-मुरकुटे-ससाणेंची सत्ता

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विखे- मुरकुटे - ससाणे युतीने एकहाती निर्विवाद वर्चस्व मिळविले. या गटाने १८ पैकी १७ जागांवर विजय मिळवून सत्ता ताब्यात ठेवली. निवडणुकीत आ. लहू कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, शेतकरी संघटनेचे अॅड. अजित काळे आणि शिवसेनेचे (ठाकरे गट ) सचिन बडधे यांच्या नेतृत्वाखालील मंडळाचा पराभव झाला. व्यापारी मतदार संघातून किशोर एकनाथ कालंगडे हे अपक्ष उमेदवार विजयी झाले.

APMC Election Result : राहात्यात विखेंचाच डंका, श्रीरामपुरात श्रीरामपुरात विखे-मुरकुटे-ससाणेंची सत्ता
APMC Election Result : पारनेरात लंके-औटींची सत्ता; विखे गटाचा मोठा पराभव

नेवाशात गडाखच

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांची ‘बॅट' पुन्हा एकदा तळपली असून मतदान झालेल्या सर्वच्या सर्व १७ जागा बहुमताने जिंकून एकहाती सत्ता कायम राखली आहे. एक जागा आधीच बिनविरोध निवडून आलेली असल्याने गडाखांच्या नेतृत्वाखालील सहकार मंडळाचा एकतर्फी विजय झाला आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व विठ्ठलराव लंघे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

अकोलेत महाविकास आघाडीचा विजय

अकोले तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने ११ जागा जिंकत बहुमत मिळविले तर विरोधी भाजपला ७ जागांवर समाधान मानावे लागले. त्यातील ३ जागा त्यांनी पूर्वीच बिनविरोध जिंकलेल्या होत्या. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मते बाद झाली त्याचा फटका भाजपला काही जागांवर बसला. आ. डॉ. किरण लहामटे व अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी प्रणित शेतकरी समृद्धी मंडळ आणि माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित शेतकरी विकास मंडळ यांच्यात १५ जागांसाठी सरळ लढत होती.

शेवगावात घुलेंनी गड राखला

शेवगाव येथे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी आपला गड कायम राखला तर जामखेड येथे कर्जत प्रमाणे आ. पवार व आ. आ. शिंदे यांना फिप्टी फिप्टी कौल मतदारांनी दिला आहे. शेवगाव बाजार समितीवर स्थापनेपासून माजी आमदार चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले यांची सत्ता आहे. घुले यांनी या निवडणुकीत आ. मोनिका राजळे यांचे कडवे आव्हान मोडून काढत पुन्हा आपला गड राखण्यात यश मिळवले आहे. घुले यांनी यंदा अभूतपूर्व बदल करत बाजार समितीत नव्या १६ चेहऱ्यांना संधी दिली. हा बदल मतदारांनी स्विकारला. जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीकडे बहुमत असताना चंद्रशेखर घुले यांना अध्यक्षपदापासून दूर राहावे लागले होते. यामुळे घुले यांनी या निवडणुकीत प्रत्येक पाऊल सावधपणे टाकले. शनिवारी पाथर्डी बाजार समितीत आ. राजळे यांच्या आदीनाथ पॅनलने १८ पैकी १७ जागा जिंकत राष्ट्रवादीच्या ताब्यातील बाजार समिती हिसकावून घेतली. याचा परिणाम शेवगाव बाजार समिती निकालात होईल अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु सर्वच्या सर्व १८ संचालक निवडून आणत या सर्व शक्यता घुले यांनी मोडित काढल्या.

जामखेड फिप्टी फिप्टी

जामखेड बाजार समितीवर आ. प्रा. राम शिंदे यांची सत्ता होती. परंतु आ. रोहित पवार यांनी त्यांच्या ताब्यातील अनेक संस्था काबीज करण्याचा धडाका लावला आहे. कर्जत बाजार समिती निवडणुकीत मतदारांनी आ. शिंदे व आ. पवार यांचे समान ९-९ संचालक निवडुन देत टक्कर कायम ठेवली. हाच कित्ता जामखेडच्या बाजार समितीत गिरवला गेला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com