आपेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी वाल्मिक भुजाडे संतोष पगारे उपाध्यक्ष

आपेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी वाल्मिक भुजाडे संतोष पगारे उपाध्यक्ष

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील आपेगाव सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे वाल्मीक श्रीराम भुजाडे तर उपाध्यक्षपदी संतोष राधू पगारे यांची निवड झाली. त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्री. गांगुर्डे यांनी काम पाहिले.

वाल्मीक भूजाडे यांच्या नावाची सूचना संचालक लहानु गव्हाळे यांनी केली तर त्यास रामभाऊ खिलारी यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी नागनाथ गायकवाड यांनी सूचना केली तर दादासाहेब गव्हाळे यांनी अनुमोदन दिले. प्रारंभी पूर्व भागाचे कैवारी व संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्यांना उजाळा देवून त्यांचा पुर्णाकृती पुतळा पंचायत समिती कोपरगावच्या आवारात उभारण्यात यावा म्हणून ठराव करण्यात आला. कोपरगांव बाजार समितीचे माजी संचालक अंबादास पाटोळे यांनी प्रास्तविकात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी संकटकाळात केलेल्या कामाची माहिती दिली.

नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दत्तात्रय पाटोळे, सोपानराव गव्हाळे, ज्ञानदेव गायके, सरपंच मंगलताई भूजाडे, उपसरपंच गणपतराव गव्हाळे, प्रकाश गव्हाळे, हरिभाऊ गव्हाळे, आसाराम पगारे आदींनी अभिनंदन केले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिव प्रविण गव्हाळे, बाळासाहेब शिंदे यांनी सहकार्य केले. उपसरपंच गणपतराव गव्हाळे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.