अनुराधा आदिक
अनुराधा आदिक
सार्वमत

पथविक्रेता सुविधा योजनेचा लाभ घ्यावा : अनुराधा आदिक

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

करोना संसर्गजन्य रोगामुळे शहरातील रस्त्यावर विविध माल विक्रेत्यांच्या उपजिवीकेवर विपरीत परिणाम झाला आहे. लॉकडाऊन काळात त्यांच्याकडे असलेले जे काही भांडवल होते तेही या टाळेबंदीमध्ये शिल्लक राहिलेले नाही. केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी पथविक्रेता विशेष पतपुरवठा सुविधा योजनेची शहरात अंमलबजावणी करण्यात येणार असून रस्त्यावर खाद्यपदार्थ, भाजा, फळे विक्रेत्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले आहे.

राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, विविध बचतगट, मायक्रो फायनान्स यांना रस्त्यावर वेगवेगळे मला विक्री करणार्‍या विक्रेत्यांना खेळते भांडवल म्हणून 10 हजार रुपयांपर्यंत कर्ज स्वरूपात रक्कम देण्यात येणार आहे. या कर्जाची फेड व्याज अनुदान 7 टक्क असून दर तीन महिन्यांनी 4 वेळा व्याज अनुदान जमा होईल. सदरीची योजना ही 31 मार्च 2022 पर्यंत ठेवण्यात येणार आहे. या व्यवसायातील सुशिक्षित असलेल्या व डिजिटल व्यवसायातून व्यवहार करणार्‍यास 1000 रुपये कॅशबॅक देण्याचेही या योजनेत समाविष्ट झालेले आहे.

नगरपरिषदेमध्ये नोंदीत असलेल्या रस्त्यावरील जास्तीत जास्त व्यावसायिकांनी या योजनेत सहभागी होवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषद कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत केले. या बैठकीस नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, नगरसेवक राजेंद्र पवार, नगरसेवक रवींद्र पाटील, कामगार नेते नागेश सावंत, रईस जहागिरदार, महाराष्ट्र सर्वोधोग कामगार कर्मचारी युनियन मुंबई सहचिटणीस राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com