शेतकर्‍यांची पिके निघाल्यानंतर महावितरणने थकीत वीज वसुलीची मोहीम हाती घ्यावी

महाराष्ट्र कृषक समाजाच्या अध्यक्षा अनुराधा आदिक यांची मागणी
शेतकर्‍यांची पिके निघाल्यानंतर महावितरणने 
थकीत वीज वसुलीची मोहीम हाती घ्यावी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शेतकरी अडचणीत असल्याने शेतकर्‍यांची पिके निघाल्यानंतर महावितरणने थकीत वीज वसुलीची मोहीम हाती घ्यावी,

अशी मागणी महाराष्ट्र कृषक समाजाच्या अध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केली आहे.

महाराष्ट्र कृषक समाजाच्या अध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देताना समन्वयक भागचंद औताडे, शहराध्यक्षा अर्चनाताई पानसरे, जयाताई जगताप, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, बापूसाहेब पटारे, रामभाऊ औताडे, मारुती औताडे, भाऊसाहेब औताडे, नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, अल्तमश पटेल, सुनील थोरात, आप्पासाहेब आदिक, सागर कुर्हाडे, आदित्य आदिक, अनिरुद्ध भिंगारवाला, हर्षल दांगट, अमोल आदिक, रोनित घोरपडे, गोपाल वायंदेशकर, निरंजन भोसले, सोहेल शेख, अर्जून आदिक आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अनुराधा आदिक म्हणाल्या की, शेतकर्‍यांच्या थकित वीज बीलापोटी रोहित्र बंद करण्याची कार्यवाही महावितरणने तातडीने थांबवावी. शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटामुळे पिचलेला आहे. त्यातच महावितरण कडून सक्तीची वीज बील वसूली मोहिम राबविण्यात येत आहे त्याबाबत अधिकार्‍यांनी रोहित्र बंद करण्यापूर्वी गावोगाव शेतकर्‍यांशी चर्चा केली पाहिजे. वीज बिल भरण्यासाठी शेतकर्‍यांना सवलत दिली पाहिजे. राज्य शासनामार्फत नव्याने राबविण्यात येणार्‍या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचविल्या पाहिजेत. याप्रसंगी राजेंद्र पवार, कैलास बोर्डे, भागचंद औताडे, आदित्य आदिक यांनी आपले मनोगत मांडले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com