देशविरोधी घोषणाबाजी करणार्‍या मुख्य सूत्रधारास पोलीस कोठडी

देशविरोधी घोषणाबाजी करणार्‍या मुख्य सूत्रधारास पोलीस कोठडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वातंत्र्यदिनी भुईकोट किल्ल्यात हत्ती दरवाजा येथील दर्ग्याजवळ देश विरोधात वादग्रस्त घोषणाबाजी करणार्‍या मुख्य सूत्रधारास पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने दोन दिवसांची ( दि.21) पोलिस कोठडी सुनावली आहे. टैप्या उर्फ जैद सैय्यद (रा. मुकुंदनगर) असे मुख्य संशयित आरोपीचे नाव आहे.

स्वातंत्र्यदिनी भुईकोट किल्ल्यात हत्ती दरवाजा येथील दर्ग्याजवळ देश विरोधात वादग्रस्त घोषणाबाजी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात कलम 153 अ, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किल्ल्यात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांनी व भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने पाचही जणांना ताब्यात घेतले. यामध्ये तिघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. दरम्यान, दोघा संशयित आरोपींना बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यांचे वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिला.

याच वेळी कोर्टरूममध्ये एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने एका संशयित आरोपीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात खळबळ उडाली होती. परवेज इजाज पटेल (वय 21, रा. अमिना मस्जिदजवळ, आलमगीर), अरबाज शेख (रा. कोठला) या दोघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज (शनिवार) त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर टैप्या उर्फ जैद सैय्यद यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com