28 हजारांची लाच घेताना धोत्रेचे कामगार तलाठी जेरबंद

28 हजारांची लाच घेताना धोत्रेचे कामगार तलाठी जेरबंद

कोपरगाव (प्रतिनिधी) - तालुक्यातील धोत्रे येथील कामगार तलाठी सुशील राजेंद्र शुक्ला यास तक्रारदाराकडून वाळूचोरीचे वाहनावर कारवाई टाळण्यासाठी 28 हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. या पूर्वीही कोपरगाव तालुक्यात तीन तलाठी या विभागाने गतवर्षी जेरबंद केले आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करण्यास प्रतिबंध केलेला असताना वाळूचोर महसुली अधिकारी व कर्मचार्‍यांच्या आशीर्वादाने बिनधास्त वाळूचोरी करताना दिसत आहे. कोपरगाव येथील एका इसमाकडून त्याचे वाळूचोरीत सापडलेले वाहन सोडण्यासाठी 68 हजार रुपये रकमेची मागणी धोत्रे येथील तलाठी सुशील शुक्ला याने केली होती. त्या नंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभाग नाशिक यांचेकडे तक्रार केली होती. त्या प्रमाणे लाचलुचपत विभागाने तलाठ्याला पकडण्यासाठी सापळा लावला होता. त्यानुसार त्यांनी तक्रारदाराने या तलाठ्याकडे तडजोड रक्कम म्हणून 28 हजार रुपये ठरवले होते व ती रोख 28 हजारांची प्रक्रिया केलेली रक्कम लाचलुचपत विभागाने तक्रारदाराकडे सुपूर्त केली होती. ही रक्कम स्वीकारताना शनिवारी तलाठी पंचासमक्ष पकडला गेला आहे.

नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांनी ही कारवाई केली. त्यांना सहाय्यक अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे यांनी मदत केली. या सापळा पथकात पोलीस नाईक प्रवीण महाजन, श्री गरुड, श्री.कराड, चापोशी, जाधव यांचा समावेश होता.

Related Stories

No stories found.