अज्ञात वाहनांच्या धडकेत काळवीट जागीच ठार

अज्ञात वाहनांच्या धडकेत काळवीट जागीच ठार

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा ते नेवासा फाटा रस्त्यावरील (Newasa-Newasa Phata Road) पावन गणपती परिसरात सायंकाळी ६ वाजता एका अज्ञात वाहनांच्या धडकेत काळवीट जागीच ठार (Antelope Died in Accident) झाल्याची घटना घडली आहे.

यावेळी घटनेची माहिती कळताच तात्काळ वनविभागाचे आधिकारी थेटे यांनी घटनास्थळी कर्मचारी पाठवून काळवीटाला पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये (Veterinary Hospital) हलवले आहे.

यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची मोठी गर्दी पहावयास मिळाली काही सामाजिक कार्यकर्ते यांनी काळवीटास पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र मार जास्त लागलेला असल्याने काळवीटाने आपले प्राण जागीच सोडले असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com