पत्रकार संरक्षण कायद्याबाबत केंद्राशी बोलणार - हजारे

कामगार कायद्यातून पत्रकारांना वगळल्याने चिंता
अण्णा हजारे
अण्णा हजारे

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

पत्रकार संरक्षण कायद्याविषयी फार मोठा गवगवा झाला असला तरी कार्यवाही झालेली दिसत नाही. तसेच दुसरीकडे कामगार कायद्यातून पत्रकारांना वगळले आहे. म्हणून सर्व माहिती घेऊन पत्रकार संरक्षण कायद्या विषयी पाठपुरावा करू,असे ठोस आश्वासन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांच्यासह शिष्टमंडळाने राळेगणसिध्दी येथे अण्णांची भेट घेत पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली.

यावेळी हजारे म्हणाले, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आपण सदैव तत्पर असून शासनाने याबाबत काय भूमिका घेतली याचीही माहिती घेऊ. पत्रकारांच्या कायद्याविषयी दुर्लक्ष करून शासन काय साध्य करणार असा सवाल करत अण्णा म्हणाले, वेळप्रसंगी पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण आग्रभागी राहू.

डॉ.विश्वास आरोटे म्हणाले, करोनाकाळामध्ये पत्रकारांनी जीव धोक्यात घालून प्रबोधन केले. राज्यात सुमारे 240 पत्रकारांचा करोनाने बळी घेतला. तात्कालिन अरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना पन्नास लाख रुपयाचे विमा कवच देण्याचे जाहीर केले. मात्र ती घोषणा कागदावरच राहिली आहे. मयत पत्रकारांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच केंद्र शासनाच्या नवीन कामगार धोरणातून पत्रकारांना वगळले असून या कायद्यावर हरकत घेणार असून अण्णा हजारेंकडे पाठबळ देण्याची विनंती केली.यावेळी राज्य पत्रकार संघाचे संजय फुलसुंदर, संजय मोरे, पत्रकार संघाचे सचिव राम तांबे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com