'गांधीयन फिलोसोफी' अवॉर्डने अण्णा हजारे सन्मानित

राळेगणसिध्दीमध्ये पर्यावरण संमेलनात झाला सन्मान
'गांधीयन फिलोसोफी' अवॉर्डने अण्णा हजारे सन्मानित

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

राळेगणसिद्धी (Raleganasiddhi) येथे शनिवारी सुरू झालेल्या पाचव्या पर्यावरण संमेलनत (Environmental Conference) ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांना सुर्यादत्ता फाउंडेशनच्या वतीने गांधीयन फिलोसोफी अवॉर्ड (Gandhian Philosophy Award) देऊन सन्मानित करण्यात आले.

निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (Nature Social Environment Pollution Prevention Board) महाराष्ट्र राज्य व प्रदूषण नियंत्रण मंडळ (Pollution Control Board) यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवी पर्यावरण संमेलन शनिवारपासून राळेगणसिद्धी (Raleganasiddhi) येथे आयोजित केले आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे (Anna Hajare) होते. श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत (Shirdi Sai Baba Trust CEO Bhagyashree Banait) यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पराग मते, राजा देशमुख, दिनकर टेमकर, सुवर्णा माने, कीर्ती जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.या दोन दिवसीय संमेलनात तज्ज्ञ मान्यवर विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com