अण्णा हजारे यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

लोकायुक्त कायदा समितीच्या बैठका घेण्याची सुचना
अण्णा हजारे यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
अण्णा हजारे

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

ज्येष्ठ समाजसेवक पद्मभुषण अण्णा हजारे यांनी लोकयुक्त कायद्यासाठी आक्रमकपणा घेतला मंगळवारी (दि.17) त्यांनी पुन्हा चार पानांचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले आहे. यात लोकायुक्त कायद्याचा मसुदा समितीच्या आश्वासनाप्रमाणे बैठका घेण्यास मुख्य सचिवांना सांगण्यात यावे अशा सुचना केल्या आहेत.

अण्णा हजारे यांनी सोमावारी पारनेर येथे प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधत आघाडी सरकार व मुख्यमंत्र्यांवर रोष व्यक्त केला होता. लोकायुक्त कायदा करा अन्यथा पायउतार व्हा असा निर्वानीचा इशारा त्यांनी दिला होता. याची सर्व राज्याज चर्चा असताना यानंतर लगेच दुसर्‍याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. यापुर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाच ते सहा पत्र लिहीली आहेत. आता या पत्रामुळे व शासनाला दिलेल्या इशारामुळे पुढील काळात आण्णा व सरकार यात संघर्ष होतो की .कायद्यावर कारवाई होते याची उत्सुकता राजकीय नेत्यासह सर्वमान्यना लागली आहे .

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे की. महाराष्ट्र राज्यामध्ये लोकायुक्त कायद्याचा मसुदा करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या दिनांक 11 जून 2019 ते 8 ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण सात बैठका झाल्या आहेत. आता फक्त एक किंवा दोन बैठका होतील. आपण दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्या बैठका घेण्यास मुख्य सचिवांना सांगण्यात यावे.तसे झाल्यास लोकायुक्त कायद्या करण्यास वेग येईल.

केंद्रामध्ये लोकपाल आणि देशातील प्रत्येक राज्यामध्ये लोकायुक्त कायदा कसा असावा यासाठी संसदेमध्ये दिनांक 27 ऑगस्ट 2011 रोजी सर्व संमतीने कायदा करण्यात आला आहे. सदर कायदा व्हावा यासाठी 1966 पासून 45 वर्षात आठ वेळेला संसदेत बिल आले होते. मात्र पास झाले नव्हते. म्हणून 16 ऑगस्ट 2011 रोजी दिल्लीच्या रामलिला मैदानावर उपोषण सुरू केले होते. देशातील लाखो लोक आंदोलनात सहभागी होण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. यासह आण्णांनी आपल्या चार पानी पत्रात लोकपाल व लोकआयुक्त कायद्याचा संपुर्ण इतिहास मांडत संपूर्ण घटनाक्रम मांडला आहे. यात आण्णानी लोकपाल व लोकयुक्तचा संघर्ष मांडला आहे.

या कायद्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुन अंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी दिला आहे. आण्णाच्या पञ्त्राला मुख्यमंत्री व सरकार काय उत्तर देते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com