शरीरात प्राण असेपर्यंत काम करत राहणार - अण्णा हजारे

कार्यकर्त्यांना प्रोत्साहन म्हणून असे बोललो, निवृत्ती नाही
अण्णा हजारे
अण्णा हजारे

सुपा |वार्ताहर| Supa

गेल्या काही दिवसांत राळेगण परिवाराने खूप चांगल्या पद्धतीने गावात विकास कामे केली आहेत ते पाहून खूप समाधान वाटत आहे.

त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी आणखी पुढे यावे. त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी मी आता थोडा थांबतो, असे म्हणालो होतो असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी उशीरा स्पष्टीकरण दिले.

रविवारी पद्मावती मंदीरातील नवरात्रोत्सवच्या कार्यक्रमात अण्णांनी कार्यकर्त्यांनी पुढे येण्यासाठी थांबायचे बोलून दाखवले हे वृत्त सार्वमतसह काही ठिकाणी प्रसिध्द् होताच राज्यासह देशभरातील प्रसार माध्यमे व कार्यकर्त्यांत मोठी खळबळ उडाली.दिवसभर कार्यालयातील फोन खनखनू लागला. शेवटी मंगळवारी सांयकाळी अण्णांनी खुलासा केला की, ‘मी कसला निवृत्त होतो.

आणि निवृत्त होऊन काय करणार? शरीरात प्राण असेपर्यंत समाजकार्य करतच रहाणार आहे. गेल्या काही महीन्यात माझ्या गैरहजेरीत गावातील मंडळीनी खुप चांगल्या पद्धतीने राळेगण मध्ये विकास कामे केली. ते पाहून खुप समाधान वाटले म्हणून म्हटले यापुढे मी गावातून थोडे लक्ष्य कमी करतो. तुम्ही गावकरी खुप चांगले काम करत आहात. राळेगण परिवारातील कार्यकर्याना पाठबळ देणाचा उदेश आहे, निवृत्ती वगरे काही नाही असेेही अण्णा म्हणाले.या खुलाशाने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com