अण्णा हजारेंनी राळेगणमध्ये मतदानाचा हक्क बजावला

अण्णा हजारेंनी राळेगणमध्ये मतदानाचा हक्क बजावला

सुपा |वार्ताहर| Supa

राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी मतदान केले. आ. निलेश लंके यांनी गावातील दोन्ही गटाच्या मुख्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले.

याला दोन्ही गटांनी सहमती दर्शवली. यावर अण्णांनीही आनंद व्यक्त केला होता; परंतु गावातील काही युवकांना हा निर्णय रुचला नाही. त्यांनी स्वतंत्र पॅनल उभा करून लढत देण्याचा निर्णय घेतला. तेथेच जुळवलेले सर्व विस्कटले. नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या दोन जागा बिनविरोध झाल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com